मुंबई | टीम इंडियाच्या युवा यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 179 धावांची खेळी. केली. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अर्शीन कुलकर्णी आणि मुशीर खान या दोघांनंतर कॅप्टन उदय सहारन आणि महाराष्ट्राच्या बीडमधील सचिन धस या दोघांनी शतकी खेळी केली आहे. नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 297 धावा केल्या.
उदयने नेपाळ विरुद्ध 107 बॉलमध्ये 9 चौकारांसह 100 धावा केल्या. मात्र उदयला शतकानंतर एकही धाव करता आली नाही. उदयला गुलशन झा याने सुभाष भंडारी याच्या हाती कॅच आऊट केलं. तर दुसऱ्या बाजूला सचिन धस या बीडच्या पठ्ठ्याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक करत डाव सावरला. सचिनने 101 बॉलमध्ये 3 षटकारांसह 11 चौकारांच्या मदतीने 116 धावांची खेळी केली.
सचिन धस आणि उदय सहारन या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाकडून आदर्श सिंह याने 21, प्रियांशू मुलिया याने 19 आणि अर्शीन कुलकर्णी याने 18 धावांचं योगदान दिलं. तर नेपाळकडून गुलशन झा याने 3 विकेट्स मिळवल्या. तर आकाश चांद याच्या खात्यात 1 विकेट गेली.
सचिन आणि उदयची शतकी खेळी
Innings break!
Centuries from Sachin Dhas & Captain Uday Saharan power #TeamIndia to 297/5 👏👏
Stay tuned for the second innings ⏳
Scorecard ▶️ https://t.co/6Vp3LnoN6N#BoysInBlue | #INDvNEP pic.twitter.com/bkOR245hwD
— BCCI (@BCCI) February 2, 2024
दरम्यान टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर सुपर 6 मध्ये टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला होता. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये 6 पॉइंट्ससह अव्वलस्थानी आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे आणि आराध्य शुक्ला.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन | देव खनाल (कर्णधार), अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद आणि दुर्गेश गुप्ता.