IND vs USA Live Streaming | टीम इंडियासमोर यूएसएचं आव्हान, मॅच कुठे पाहता येणार?
India vs USA Live Streaming | टीम इंडियाने उदय सहारन याच्या नेतृत्वात अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सलग 2 विजय मिळवले आहेत. आता टीम इंडिया तिसऱ्या विजयासाठी सज्ज आहेत. टीम इंडियाचा तिसरा सामना हा यूएसए विरुद्ध होणार आहे.
मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आतापर्यंत 22 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील 23 वा सामना हा ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यात होणार आहे. उदय सहारन याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर रिषी रमेश हा यूएसएचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यातील सामना हा रविवारी 28 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यातील सामना हा मॅनगाँग ओव्हल, ब्लूमफॉन्टेन येथे पार पडणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहता येईल.
टीम इंडिया नंबर 1
दरम्यान टीम इंडियाने ए ग्रुपमधून खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने बांगलादेश आणि आयर्लंडचा धुव्वा उडवत सलग 2 विजय मिळवले आहेत. तर आता टीम इंडियाला यूएसए विरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश (विकेटकीपर), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, रुद्र पटेल, प्रेम देवकर, मोहम्मद ए. , इनेश महाजन , राज लिंबानी आणि अंश गोसाई.
यूनायटेड स्टेट्स | ऋषी रमेश (कॅप्टन), प्रणव चेट्टीपलायम (विकेटकीपर), भव्य मेहता, सिद्धार्थ कप्पा, उत्कर्ष श्रीवास्तव, अमोघ आरेपल्ली, पार्थ पटेल, खुश भालाला, अरिन नाडकर्णी, एतेंद्र सुब्रमण्यम, आर्य गर्ग, मानव नायक, आर्यमन सुरी, अर्जुन महेश, अर्जुन महेश , आर्यन बत्रा आणि रायन भगानी.