U19 IND vs SA Toss | सेमी फायनलमध्ये टीम इंडियाच्या बाजूने टॉस, प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठा बदल
U19 India vs South Africa Semi Final Toss | टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे.
बेनोनी | क्रिकेट विश्वाला आता 3 सामन्यांनंतर अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम मिळणार आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 4 संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. या स्पर्धेतील पहिला सामना हा आज 6 फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क बेनोनी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला.
टीम इंडियात मोठा बदल
टीम इंडियाचा कॅप्टन उदय सहारन याने नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये फक्त 1 बदल केला आहे. आराध्य शुकला याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये नमन तिवारी याला संधी देण्यात आली आहे. आता नमन या संधीची किती फायदा करुन घेतो आणि टीम इंडियासाठी किती योगदान देतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची पहिल्यांदाच फिल्डिंग
दरम्यान टीम इंडियाने या स्पर्धेत पहिल्यांदाच टॉसनंतर फिल्डिंग करणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत साखळी फेरीतील 3 सामन्यांनंतर सुपर 6 राउंडमधील दोन्ही सामने हे दुसऱ्या डावात जिंकले. थोडक्यात असं की टीम इंडियाने कायम टॉसनंतर बॅटिंग केली आहे. आता ही फिल्डिंगची पहिलीच वेळ असल्याने भारतीय गोलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकला
India won the toss and elected to field in the #U19WorldCup semi-final!#INDvSAhttps://t.co/vXe5XBYZzX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 6, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.