IND vs NZ Live Streaming | सुपर 6 मधील पहिल्याच सामन्यात टीम इंडिया-न्यूझीलंड आमनेसामने
U19 World Cup 2024 India vs New Zealand Super 6 Live Streaming | उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकत जबरदस्त कामगिरी केली आहे. आता टीम इंडिया सुपर 6 राऊंडसाठी सज्ज झाली आहे. हा सामना कधी आणि कुठे आहे?
मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अर्शीन कुलकर्णी याचं शतक आणि नमन तिवारी याच्या 4 विकेट्सच्या जोरावर विजय मिळवला. टीम इंडियाने यूएसएवर 201 धावांनी मात केली. यूएसएला विजयासाठी मिळालेल्या 326 धावांचा पाठलाग करताना 50 ओव्हरमध्ये 125 धावाच करता आल्या. टीम इंडिया या विजयासह ए ग्रुपमध्ये टेबल टॉपर ठरली. आता टीम इंडिया सुपर 6 फेरीसाठी सज्ज झाली आहे. सुपर 6 राऊंडला 30 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातच सुपर 6 मधील पहिला सामना होणार आहे. सुपर 6 मधील पहिला सामना कधी आणि कुठे होणार, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा 30 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा मॅनगाँग ओव्हल ब्लूमफॉन्टेन येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर पाहता येईल.
अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे, अंश गोसाई, धनुष गौडा, आराध शुक्ला, रुद्र पटेल, प्रेम देवकर, मोहम्मद अमान आणि इनेश महाजन.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | टॉम जोन्स, ल्यूक वॉटसन, स्नेहिथ रेड्डी, ऑलिव्हर तेवतिया, ऑस्कर जॅक्सन (क), लचलान स्टॅकपोल, झॅक कमिंग, सॅम क्लोड (विकेटकीपर), मॅट रो, रायन त्सोर्गस, मेसन क्लार्क, जेम्स नेल्सन, ॲलेक्स थॉम्पसन, इवाल्ड श्र्युडर आणि रॉबी फॉल्केस.