U19 World Cup India Final : उपांत्य फेरीत सचिन धस आणि सहारनने रचला विजयी मार्ग, विजयानंतर कर्णधार म्हणाला..
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा 2 गडी राखून विजय मिळवला. या विजयात कर्णधार उदय सहारन आणि बीडच्या सचिन यांनी मोलाची भूमिका बजावली. या विजयासाठी टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाचा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी सामना होणार आहे.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्णधार उदय सहारन आणि बीडच्या सचिन धसने लाज राखली. संघाचे चार गडी झटपट बाद झाल्यानंतर पाचव्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. एक क्षण असा वाटत होता की दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकेल. पण सचिन धस आणि उदय सहारनने हा अंदाज फोल ठरवला. तसेच दक्षिण गोलंदाजांवर भारी पडले. या दोघांपैकी एकाला बाद करताना चांगलीच दमछाक झाली. दोघांनी 171 धावांची भागीदारी केली. सचिन धसचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं खरं पण तिथपर्यंत विजय दृष्टीक्षेपात होता. त्यामुळे या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन धसने 95 चेंडूत 96 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर कर्णधार उदय सहारने याने 124 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यात 6 चौकारांचा समावेश होता. कर्णधार उदय सहारन याला महत्त्वपूर्ण खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या खेळीनंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
काय म्हणाला कर्णधार उदय सहारन?
” एका क्षणी वाटत होतं की सामना हातून जातो की काय? सामन्यात खूपच मागे होतो. पण निश्चय केला होता की, शेवटपर्यंत फलंदाजी करायची आहे. इतकंच आम्ही एकमेकांना समजावत होतो. एका भागीदारीने सर्वकाही शक्य होतं. मला ते माझ्या वडिलांकडून शिकायला मिळालं. जेव्हा मी बॅटमध्ये गेलो तेव्हा बॉल बॅटवर बऱ्यापैकी येत होता.”, असं उदय सहारन याने सांगितंल. “आम्ही ड्रेसिंग रूममध्ये मनोबल अजिबात कमी होऊ देत नाही. ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि प्रशिक्षक उत्कृष्ट आहेत. अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद वाटतो. अतितटीच्या सामन्याची गोष्टच काही वेगळी आहे.”, असंही उदय सहारन पुढे म्हणाला.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार उदय सहारनने गोलंदाजी निवडली होती. दक्षिण अफ्रिकेला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण त्यांनी 244 धावा करत विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताने एकवेळ अशी स्थिती होती की अवघ्या 32 धावांवर 4 विकेट गेल्या होत्या. पण सचिन सहारनने सचिनच्या धसच्या मदतीने मोठी पार्टनरशिप केली आणि संघाला पराभवाच्या दरीतून बाहेर काढलं. भारताने 48.5 षटकात 8 गडी गमवून विजयी धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका U19 (प्लेइंग इलेव्हन): ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान मारेस, जुआन जेम्स (कर्णधार), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे.