U19 World Cup : ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावातच विजय निश्चित! पाकिस्तानला अवघ्या इतक्या धावांवर रोखत ढकललं बॅकफूटवर
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता विजय निश्चित आहे असंच म्हणावं लागेल.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरश: माती खाल्ली. अझान अवैस आणि अराफन मिन्हास वगळता एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 50 षटकात फक्त 179 धावा करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेलं 180 धावांचं आव्हान रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियन संघात बराच फरक आहे. वेगवान गोलंदाजीला खेळण्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा अंदाज सर्वश्रूत आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला खऱ्या अर्थाने नशिबावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच सुरुवातीचे विकेट झटपट बाद केले तर दबाव वाढवता येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज कशी गोलंदाजी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. अंतिम फेरीत भारत पाकिस्तान की भारत ऑस्ट्रेलिया लढत होते हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर अझान अवेस यानेच चिवट खेळी केली. एकीकडे झटपट गडी बाद होत असताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. 91 चेंडूंचा सामना करत 52 धावांची खेळी केली. तर अराफत मिन्हास याची उत्तम साथ मिळाली. त्याने 61 चेंडूत 52 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही खेळाडू साजेशी कामगिरी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने सर्वाधिक 6 गडी बाद केले. तर महली बिअर्डमॅनने 1, कॅलम विडलरने 1, टॉम कॅम्पबेल आणि राफ मॅकमिलनने 1 गडी बाद केला.
पाकिस्तानला एखादा चमत्कारच पराभवापासून रोखू शकतो. पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या हाती आता विजयाची चावी असणार आहे. गोलंदाजी चालली आणि झटपट विकेट गेले तर मात्र विजय काही अंशी दृष्टीक्षेपात पडेल. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यातील विजयी संघाचा सामना 11 फेब्रुवारीला टीम इंडियाशी होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर
पाकिस्तान U19 (प्लेइंग इलेव्हन): शमिल हुसैन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, नावेद अहमद खान, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली रझा