U19 World Cup: बच के रहना रे बाबा! इंग्लंडच्या 5 धडाकेबाज खेळाडूंपासून भारताला धोका
19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत-इंग्लंड पहिल्यांदाच भिडणार आहेत. पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे भारताचे लक्ष्य आहे. पण, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडच्या 5 धोकादायक खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे.
1 / 6
19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत-इंग्लंड पहिल्यांदाच भिडणार आहेत. पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे भारताचे लक्ष्य आहे. पण, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडच्या 5 धोकादायक खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे. इंग्लंडला अंतिम फेरीत नेण्याचे श्रेय या खेळाडूंना जाते. यश धुल आणि कंपनीला इंग्लंडच्या याच 5 खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते 5 धोकादायक खेळाडू? (Photo: Cricket World Cup)
2 / 6
टॉम प्रेस्ट (Tom Prest) : इंग्लंड संघाचा कर्णधार टॉम प्रेस्ट भारतीय संघासाठी सर्वात मोठी समस्या बनू शकतो. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू आहे. त्याने 5 सामन्यात 73 च्या सरासरीने 292 धावा केल्या आहेत. (Photo: Cricket World Cup)
3 / 6
रेहान अहमद (Rehan Ahmed) : सध्याच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या या फिरकीपटूने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने केवळ 3 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 10 पेक्षा कमी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रहमानने 4 विकेट घेत आपल्या संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला. (Photo: Cricket World Cup)
4 / 6
जोशुआ बॉयडेन (Joshua Boyden): हा 17 वर्षीय खेळाडू इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख आहे. या विश्वचषकात आतापर्यंत जोशुआने 5 सामन्यात 9.53 च्या सरासरीने 13 बळी घेतले आहेत. या स्पर्धेत तो चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच वेळी, त्याची गोलंदाजीची सरासरी ही स्पर्धेतील टॉप 10 गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. (Photo: Cricket World Cup)
5 / 6
जेकब बॅथेल (Jacob Bethell) : जेकब हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 5 सामन्यात 40.60 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 203 धावा केल्या आहेत. बॅथेलने अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने आतापर्यंत 5 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo: Cricket World Cup)
6 / 6
जॉर्ज थॉमस (George Thomas) : या उजव्या हाताच्या फलंदाजाने 5 सामन्यात 2 अर्धशतकांसह 177 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी आतापर्यंतच्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. जेकब बॅथेलसोबत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. (Photo: Cricket World Cup)