वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!

पाठीमागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर्स कॉल या निर्णयावरुन बराच वादंग रंगला. याच अंपायर्स कॉलवर आता आयसीसीने मोठे निर्णय घेतले आहेत.  | Umpires Call ICC Decision

वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!
Umpires Call Stay In Internation Cricket
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:56 AM

मुंबई :  पाठीमागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर्स कॉल (Umpires Call) निर्णयावरुन बराच वादंग रंगला. या निर्णयाचा अनेक वेळा बॅट्समनला फटकाही बसला. ज्यानंतर अनेक दिग्गज बॅट्समन, खेळाडूंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याच अंपायर्स कॉलवर आता आयसीसीने (International Cricket Council) मोठे निर्णय घेतले आहेत. (Umpires Call Stay In Internation Cricket ICC 3 Changes in DRS)

अंपायर्स कॉल मुद्द्यावर आयसीसीच्या बैठकीत चर्चा

आयसीसीच्या संचालन संस्थेची बुधवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. आयसीसीचे क्रिकेट समिती प्रमुख तथा माजी भारतीय खेळाडू अनिल कुंबळे यांनी या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं, “अंपायर्स कॉल मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. तसंच त्याचा वापर किती आणि कसा असावा, यावरही चर्चा झाली”

मैदानी अंपायर्सचं महत्त्व कायम राहायला हवं

डीआरएसचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की मॅच दरम्यान दिसणाऱ्या चुका डीआरएसच्या माध्यमातून बदलता येऊ शकतात. त्यासाठी मैदानी अंपायर्सचं महत्त्व कायम राहायला हवं.

‘अंपायर्स कॉल’ निर्णय सुरुच राहणार

आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की ‘अंपायर्स कॉल’ निर्णय इथून पुढेही सुरुच राहणार आहे तसंच तो एक डीआरएसचा भाग राहिल. परंतु सद्यस्थितीच्या निर्णयांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जेणेकरुन चुका दुरुस्त केल्या जातील.

पहिला बदल

LBW च्या रिव्ह्यूसाठी किंवा पंचांकडे दाद मागताना विकेट झोनची उंची स्टंपच्या वरच्या भागापर्यंत वाढविण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, निर्णय देताना स्टम्पची उंची विचारत न घेता आता इथून पुढे बेल्सची उंची ग्राह्य धरली जाईल. आधी बेल्सच्या खालच्या भागाची उंची अंतिम मानली जात असे.

दुसरा बदल

LBW संबंधित DRS घेताना संबंधित गोलंदाज अंपायर्सला आता विचारु शकतो की बॅट्समनने बॉल खेळण्याचा प्रयत्न केला किंवा नाही. अशा विचारण्याने गोलंदाजाला नेमकं काय घ़लंय, हे अधिक स्पष्ट होईल.

तिसरा बदल

कोरोना प्रादुर्भावामुळे आयसीसीने काही नियम आणि बंधने घालून दिली आहेत. सध्याही ते नियम लागू राहणार आहेत. आयसीसीने म्हटल्याप्रमाणे, समितीने गेल्या 9 महिन्यांत देशांतर्गत पंचांच्या प्रभावी कामगिरीची नोंद केली आहे. परंतु परिस्थितीमुळे जेथे शक्य असेल तेथे तटस्थ एलिट पॅनेल पंचांच्या नेमणुकीस प्रोत्साहन दिले आहे.

(Umpires Call Stay In Internation Cricket ICC 3 Changes in DRS)

हे ही वाचा :

Video : न्यूझीलंडच्या विकेट कीपरची चलाख स्टम्पिंग, क्रिकेट फॅन्सला धोनीची आठवण, एकदा व्हिडीओ पाहाच…

हार्दिक पांड्याच्या जेवणावर कावळ्यांचा अटॅक, नताशाची अशी रिअ‍ॅक्शन…

रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.