मोहम्मद सिराज-उमरान मलिक यांच्याविरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न, टिळा न लावण्यावरुन वाद
एका बाजूला हे दोन्ही स्टार बॉलर्स धमाकेदार कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला या दोघांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचं म्हटलं जातंय. या दोघांविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे. दोघांना ठराविक गटाकडून ट्रोल केलं जात आहे.
मुंबई : टीम इंडिया सध्या तुफान फॉर्मात आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडचा टीम इंडियाने लोळवलं. टीम इंडियाने सांघिक पातळीवर जबरदस्त कामगिरी केली. आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाने वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही एक नंबर झाला. तसेच ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक यानेही आपल्या बॉलिंगने आग लावलीय. एका बाजूला हे दोन्ही स्टार बॉलर्स धमाकेदार कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला या दोघांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचं म्हटलं जातंय. या दोघांविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे.
सोशल मीडियावर या दोघांविरोधात जाणीवपूर्वक कट रचल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओत टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हे हॉटेलमध्ये चेक-ईन करतायेत. या दरम्यान हॉटेलमधील कर्मचारी या खेळाडूंना टिळा लावण्याचा प्रयत्न करतातय मात्र सिराज आणि मलिक दोघे नकार देतात.
हा व्हीडिओ सातत्याने शेअर केला जातोय. सोबतच मलिक आणि सिराज यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र नेटकरी या दोघांच्या मागे उभे आहेत. टिळा लावायची की नाही हा त्या दोघांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं मत नेटकऱ्यांनी मांडलंय.
विशेष बाब म्हणजे या व्हीडिओत मलिक आणि सिराज या दोघांव्यतिरिक्त बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी या दोघांनीही नकार दिला. नेटकऱ्यांनी या दोघांनीही टिळा लावण्यास नकार दिल्याचं मलिक आणि सिराजचा विरोध करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 4 सामन्यांची मालिका असणार आहे. मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतही मोहम्मद सिराजकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.