ढाका: वेग ही उमरान मलिकच्या गोलंदाजीची ताकत आहे. आज दुसऱ्या वनडेत त्याच्या याच ताकतीचा जलवा पहायला मिळाला. उमरान मलिकने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट काढला. त्याच्या वेगासमोर बांग्लादेशी फलंदाजाने सरेंडर केलं. उमरान मलिकने बांग्लादेशचा फलंदाज नजमुल हुसैन शांटोला बोल्ड केलं. डावखुऱ्या शांटोला उमरान मलिकने राऊंड द विकेट गोलंदाजी केली. त्याने 151 किमीप्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. बांग्लादेशी फलंदाज उमरानच्या या चेंडूच्या लाइनमध्येच येऊ शकला नाही. परिणामी त्याचा ऑफ स्टम्प उडाला.
शंटो सेट झालेला
उमरान मलिकने शंटोचा विकेट काढून टीम इंडियाला यश मिळवून दिलं. शंटो सेट झाला होता. त्याने 21 धावा केल्या होत्या. त्याने दोन चौकार मारले होते. पण उमरानच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला तंबूत परताव लागलं.
सिराजशी वाद घालणाऱ्याला उमरानने केलं शांत
ज्या शंटोला उमरानने बोल्ड केलं. तो काही ओव्हर्सआधी मोहम्मद सिराजला भिडला होता. 8 व्या ओव्हरमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला होता. सिराजशी पंगा घेणाऱ्या या फलंदाजाला उमरानने शांत केलं.
मोहम्मद सिराजची शानदार गोलंदाजी
उमरानच नाही मोहम्मद सिराजने सुद्धा शानदार गोलंदाजी केली. त्याने एनामुल हकला LBW आऊट केलं. बांग्लादेशचा कॅप्टन लिट्टन दास सुद्धा सिराजच्या सुदंर इन-कटरवर बोल्ड झाला.
You beauty❣️Umran Malik
151KMPH What a delivery ?#UmranMalik pic.twitter.com/wWWtDtADx9— Junaid Alam (@Junaid__mr27) December 7, 2022
आज विजय महत्त्वाचा
बांग्लादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा सलग दुसऱ्या वनडेमध्ये टॉस हरला. टीम इंडिया पहिला वनडे सामना एक विकेटने हरली होती. टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना करो या मरो आहे. या मॅचमध्ये पराभव झाल्यास, सीरीज हातातून निसटेल. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना जिंकण महत्त्वाच आहे.