WPL Auction 2024 मध्ये 10 लाख बेस प्राईज असलेल्या ‘या’ दोन अनकॅप भारतीय खेळाडू झाल्या करोडपती
WPL Most expensive player 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये यंदाच्या मिनी लिलावामध्ये भारताच्या दोन युवा अनकॅप खेळाडू मालामाल झाल्या आहेत. दोघींची बेस प्राईज ही 10 लाख होती मात्र दोघी लिलावामध्ये करोडपती झाल्या आहेत.
मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग 2024चा लिलाव सुरू असून यामध्ये अनकॅप भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. या लिलावामध्ये चांगल्या-चांगल्या खेळाडू अनसोल्ड राहिल्या, त्यांच्यावर कोणाही बोली लावली नाही. मात्र दोन भारतीय महिला अनकॅप खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली आहे. यामध्ये ज्या दोन अनकॅप खेळाडूंना करोडींची बोली लागली त्या कोणत्या संघाच्या ताफ्यात जाणार आहेत जाणून घ्या.
अंडर 19 खेळाडू वृंदा दिनेश हिची बेस प्राईज 10 लाख रूपये होती. वुंदा दिनेश हिला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चांगलीच लढाई सुरु होती. त्यानंतर यामध्ये यूपी वॉरियर्सनेही सहभाग घेतला. अखेर यूपी वॉरियर्सने वृंदा दिनेश हिला 1.3 कोटी रूपयांना घेतलं.
Howzatt for a purchase!
The @UPWarriorz have Vrinda Dinesh for a whopping INR 1.3 Cr 🔥🔥#TATAWPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/t6Su8jPtkk
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
A bid to remember!
Gujarat Giants win the bidding war to get Kashvee Gautam for INR 2 Cr 🔥🔥#TATAWPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/JUlusSI9M8
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 9, 2023
दुसरी खेळाडू ही काशवी गौतम ही यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरली. काशवी गौतम हिला २ कोटी रूपयांची बोली लागली आहे. हमरमनप्रीत कौरपेक्षाही काशवी गौतम हिला जास्त रक्कम बोली लागली आहे. गुजरात जायंट्सने काशवी गौतमसाठी २ कोटी खर्च केले. तिचीसुद्धा बेस प्राईज ही 10 लाख होती. काशवी गौतम ही एक वेगवान गोलंदाज आहे.