भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने दिली मात, द्रविडची शेवटची मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान 36 षटकात फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने दिली मात, द्रविडची शेवटची मालिका
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 7:31 PM

अंडर 19 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार मोहम्मद अमानने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला 49.4 षटकात सर्वबाद 184 धावा करता आल्या. भारतासमोर विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 36 षटकात 3 गडी पूर्ण केलं. पण ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान गाठताना भारताचे तीन गडी झटपट बाद झाले. साहिल पारख, रुद्र पटेल आणि अभिज्ञान कुंदू हे स्वस्तात बाद झाले. साहिल पारख 4, रुद्र पटेल 10आणि अभिज्ञान कुंदू 14 धावांवर तंबूत परतला. कर्णधार मोहम्मद अमान आणि केपी कार्तिकेय यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी नाबाद 153 धावांची भागीदारी केली आणि विजय मिळवला. मोहम्मद आमानने 89 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. यात 5 चौकारांचा समावेश आहे. तर केपी कार्तिकेयने याने 99 चेंडूत नाबाद 85 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

भारताकडून मोहम्मद इनान सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 32 धावा देत 4 गडी बाद केले. तर केपी कार्तिकेयने 9 षटकं टाकत 30 धावा दिल्या 2 गडी बाद केले. समर्थ नागराज, चेतन शर्मा, हार्दिक राज आणि किरण चोरमाले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. माजी प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मुलाची या मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. दुसरीकडे ही त्याच्या अंडर 19 क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. या मालिकेनंतर त्याचं वय 20 वर्षे होणार आहे. त्यामुळे त्याला अंडर 19 क्रिकेटमध्ये चमक दाखवण्याची शेवटची संधी आहे. आता त्याला पुढच्या सामन्यात संधी मिळते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): रुद्र पटेल, साहिल पारख, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमले, केपी कार्तिकेय, हार्दिक राज, निखिल कुमार, मोहम्मद इनान, चेतन शर्मा, समर्थ नागराज.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): रिले किंगसेल, सायमन बज (विकेटकीपर/कर्णधार), स्टीव्हन होगन, झॅक कर्टन, एडिसन शेरीफ, एडन ओ कॉनर, ऑली पॅटरसन, लिंकन हॉब्स, हेडन शिलर, थॉमस ब्राउन, विश्व रामकुमार.

नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....