वर्ल्डकप फायनलच्या हिरोने सोडली भारताची साथ, या देशाकडून खेळताना दाखवला दम

भारतात दिग्गज खेळाडूंची काही कमी नाही. भारतात क्रिकेटचं बाळकडू जन्माला आल्या आल्या मिळतं यात काही नवीन सांगायला नको. असाच भारताचा वर्ल्डकप गाजवलेला खेळाडू आज दुसऱ्या देशाकडून खेळतोय. इतकंच काय आक्रमक खेळी करत लक्षही वेधून घेतलं आहे.

वर्ल्डकप फायनलच्या हिरोने सोडली भारताची साथ, या देशाकडून खेळताना दाखवला दम
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 4:42 PM

भारतासाठी वर्ल्डकप स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूने पुन्हा एकदा मैदान मारलं आहे. मात्र यावेळी भारतासाठी नाही तर अमेरिकेसाठी आक्रमक फलंदाजी केली आहे. काही दिवसांपूर्वी या खेळाडूने भारताची साथ सोडली आणि अमेरिकेशी गाठ बांधली. आता त्याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोण नसून अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खेळलेला स्मित पटेल आहे. 2012 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये स्मित पटेलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं होतं. तसेच भारताला पराभवाच्या दरीतून बाहेर काढण्यात मोलाची साथ दिली होती. पण क्रिकेटपटू स्मित पटेल आता अमेरिकेकडून खेळत आहे. भारतीय संघात स्थान मिळत नसल्याचं पाहून स्मित पटेल तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेला आणि संघात स्थान मिळवलं. तिथे त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं. स्मित पटेलने आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तसेच संघाला विजय मिळवून दिला. स्मित पटेलने या स्पर्धेतून यूएसए संघात पदार्पण केलं आहे.

नाणेफेकीचा कौल कॅनडाच्या बाजून लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेकडून स्टीव्हन टेलर आणि स्मित पटेल दोघं मैदानात उतरले. या दोघांनी आक्रमक फलंदाजी केली. तसेच पहिल्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी केली. स्मित पटेलने 84 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. तसेच या सामन्यात अमेरिकेने 50 षटकात 8 गडी गमवून 275 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कॅनडाला फक्त 225 धावा करता आल्या आणि अमेरिकेने 50 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान वनडे क्रिकेटच्या 3 सामन्यांच्या छोट्या कारकिर्दित स्मितने मोठी कामगिरी केली. यापूर्वी 13 ऑगस्टला कॅनडाविरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केलं होतं. तेव्हा 63 धाव केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय 3 वनडे सामन्यात 22 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 171 धावा केल्या. यावेळी फलंदाजी सरासरी 57 होती. तसेच दोन अर्धशतकं ठोकली आहे.

दुसरीकडे, 2012 साली टीम इंडियासाठी अंडर 19 वर्ल्डकप खेळताना संघ संकटात असताना स्मित पटेल सहाव्या क्रमांकावर उतरला होता. तेव्हा त्याने कर्णधार उन्मुक्त चंदला उत्तम साथ दिली होती. तसेच 84 चेंडूत नाबाद 62 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 225 धावा 47.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केल्या होत्या. 97 धावांवर 4 गडी बाद अशी स्थिती असताना स्मित पटेलने उन्मुक्त चंदच्या जोडीने टीम इंडियाला विजयाच्या वेशीवर पोहोचवलं होतं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.