वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकदा ऑस्ट्रेलिया भारत सामना, आता तरी हिशेब चुकता करणार का?

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 11 फेब्रुवारीला होणार असून कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकदा ऑस्ट्रेलिया भारत सामना, आता तरी हिशेब चुकता करणार का?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी, 11 फेब्रुवारीला होणार फैसला
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 10:12 PM

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. भारताने एकही सामना न गमवता अंतिम फेरी गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा एकमेव सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर सर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 9 वेळा धडक मारली आहे. 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020, 2022, 2024 या वर्षात अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने सहावेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. 1998, 2002, 2010, 2012 2018 आणि 2024 साली अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 5 वेळा विजय, तर तीन वेळा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता भारताकडे सहाव्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत सहाव्यांदा धडक मारली आहे. यात 3 वेळा विजय, तर 2 पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिाय 2012 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत भिडले होते. दोन्ही वेळा भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता तिसऱ्यांदा भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न भंग केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देश अंडर 19 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. आता या सामन्यात कोण बाजी मारतो? याची उत्सुकता आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत अंडर 19 संघ: आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इननेश महाजन (विकेटकीपर), आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे

ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ: हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (डब्ल्यू), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.