मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सांगता झाली आहे. 13 व्या वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना 20 नोव्हेंबरला पार पडला. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट्स विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाची ही वर्ल्ड कप जिंकण्याची सहावी वेळ ठरली. तर टीम इंडिया अखेरच्या क्षणी अपयशी ठरल्याने चाहत्यांना अश्रू अनावर झाले. वर्ल्ड कप दरम्यान आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं. त्यानंतर आता आयसीसीने श्रीलंकेला आणखी एक तगडा झटका दिला आहे.
आयसीसीने श्रीलंलेकडून अंडर 19 वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान हिसकावून घेतला आहे. अंडर 19 वर्ल्ड कप श्रीलंकेत पार पडणार होता. मात्र आता दुसऱ्या देशात अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा पार पडणार आहे. आयसीसीने असा निर्णय नक्की काय घेतला, त्यामागचं नक्की कारण काय हे आपण जाणून घेऊयात.
आता अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिका इथे होणार आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट प्रशासकीय कारभार पाहता आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीची अहमदाबादमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेवला. श्रीलंकेत क्रिकेट सुरु राहिल मात्र निलंबनाचा निर्णय मागे घेतला जाणार नाही. त्यामुळे श्रीलंकेसाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा झटका आहे.
आयसीसीचा मोठा निर्णय
ICC Board announce new hosts for Men’s U19 Cricket World Cup 2024 👀
More ⬇️
— ICC (@ICC) November 21, 2023
दरम्यान या अंडर 19 वर्ल्ड कप वर्ल्ड कपमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. 4 प्रमाणे 4 ग्रुपमध्ये हे 16 संघ विभागण्यात आले आहेत. त्यानुसार, टीम इंडिया, बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिकेचा समालेश आहे. टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. तर त्यानंतर टीम इंडियाचा 18 जानेवारीला अमेरिका आणि 20 जानेवारीला आयर्लंड विरुद्ध सामना होणार आहे.
टीम इंडियालाही या निर्णयामुळे मोठा झटका लागला आहे. आता टीम इंडियाला हजारो किमीचा अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. भारत आणि श्रीलंकेतील हवाई मार्गे अंतर हे 1 हजार 582.27 किमी इतकं आहे. तर भारत ते दक्षिण आफ्रिका हे अंतर 7 हजार 860 किमी अंतर आहे. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयामुळे काही तास अधिकचा प्रवास करावा लागणार आहे.