Under 19 World Cup Final : भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात अशी असेल प्लेइंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. भारत सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? याची उत्सुकता आहे. भारताने यापूर्वी दोनदा अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे. चला जाणून घेऊयात संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्टबाबत

Under 19 World Cup Final :  भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात अशी असेल प्लेइंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट
Under 19 World Cup Final : भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर असेल मदार, जाणून पिच रिपोर्ट इतर बाबी
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 3:43 PM

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहे. अवघ्या तासात या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताला सहाव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा वर्ल्डकप जेतेपदाची संधी आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची कसर अंडर 19 वर्ल्डकप काढण्याची संधी असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण भारतीय कर्णधार उदय सहारन याने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. “नाही असं काही . सूड वगैरे घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही वर्तमानावर लक्ष केंद्रीत करत आहोत. भुतकाळात रमण्यात काही अर्थ नाही. आता पुढचं लक्ष्य गाठायचं आहे.” असं उदय सहारन याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा 2012 आणि 2018 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि भारत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन सामन्यात भारताने, तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

कर्णधार उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 3 सामने , सुपर सिक्स फेरीत सलग दोन सामने जिंकले. त्यानंतर उपांत्य फेरीत यजमान दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत असणार आहे. अंतिम फेरीसाठी टीम इंडिया संघात बदल करण्याची शक्यता फारच कमी आहे. उपांत्य फेरीपर्यंत खेळलेला संघच अंतिम फेरीत खेळताना दिसेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात तीन बदल केले होते. त्यामुळे अंतिम फेरीसाठी निश्चित काही बदल असू शकतो.

पिच रिपोर्ट

दक्षिण अफ्रिकेतील विलोमूरे पार्क मैदानात वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रविवारी झालेल्या सामन्यातही कमी स्कोअर पाहायला मिळाला होता. या मैदानात आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यात पहिल्यांदा गोलंदाजी घेणारा संघ 17, तर 8 सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, या ठिकाणी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात काही ठरावीक कालावधी पावसाचा व्यत्यय येईल. कमाल तापमान 23 आणि किमान तापमान 15 डिग्री असेल. तसेच हवामानातील आर्द्रता ही 69 टक्के असेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत अंडर 19: आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर 19: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.