U19 WC : फायनलमध्ये भारताला कोणाचं आव्हान? ऑस्ट्रेलिया पाकिस्तानच्या मनासारखं झालं

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतला आहे. आता कोणता संघ बाजी मारतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

U19 WC : फायनलमध्ये भारताला कोणाचं आव्हान? ऑस्ट्रेलिया पाकिस्तानच्या मनासारखं झालं
U19 WC : अंतिम फेरीत भारताचा सामना कोणाशी? ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस पण पाकिस्तानला हवं तेच झालं
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 1:26 PM

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरु आहे. नाणेफेकीत ऑस्ट्रेलियाचं नशिब चमकल्याचं दिसून आलं आहे. कौल बाजून लागताच कर्मधार ह्यू वेबगेन याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौलं जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच घेतली असती हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांच्या मनासारखं झालं आहे. आता सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो याची उत्सुकता आहे. अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. त्यामुळे या दोन संघातील विजेत्या संघाशी सामना होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत पाहता येईल.

“आम्ही गोलंदाजी करू. आम्हाला या खेळपट्टीचा अंदाच आहे. काही ठिकाणी सॉफ्ट दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं होईल.संघात तीन बदल केले असून कॅम्पबेल, हिक्स आणि स्ट्रेकर यांना स्थान मिळालं आहे. एका फलंदाजाची भर घातली आहे. किम्बर्लीमध्ये आम्ही फिरकीविरुद्ध फलंदाजी केली होती. वेगवान गोलंदाजीची आम्हाला सवय झाली आहे, आशा आहे की ते प्रत्यक्षात येईल.” असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगेन याने सांगितलं.

दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने अगदी मनासारखं झाल्याचं सांगितलं. ” मी नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजी घेतली असती. फलंदाजांना सुरुवातीची दहा षटकं सावध खेळावी लागतील. त्यानंतर मोठे फटके खेळण्यासाठी योग्य चेंडूची निवड करावी लागेल. फलंदाजीच्या दृष्टीने एक बदल केला असून संघात नावेदला घेतलं आहे”, असं साद बेग म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीप), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर

पाकिस्तान U19 (प्लेइंग इलेव्हन): शमिल हुसैन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, नावेद अहमद खान, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली रझा

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.