WI vs SL | गेलची देशासाठी PSL मधून माघार, आक्रमक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर कमबॅक, श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिजची घोषणा
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडिज संघाची (West Indies) घोषणा करण्यात आली आहे. संघात ख्रिस गेल (Chris Gayle) आणि फिडेस एडवर्ड्सचे (Fidel Edwards) पुनरागमन झालं आहे.
अँटिगा | श्रीलंका वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर (Sri Lanka tour of West Indies 2021 ) येणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका विंडिज विरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी विंडिजने संघाची घोषणा केली आहे. संघात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचं (Chris Gayle) 2 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. गेलने या मालिकेसाठी PSL मधून माघार घेतली आहे. तर वेगवान गोलंदाज फिडल एडवर्ड्सने (Fidel Edwards) तब्बल 9 वर्षांनी कमबॅक केलं आहे. तसेच 2 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विंडिज क्रिकेट प्रशासनाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (universe boss chris gayle and fidel edwards comeback in west indies t 20i team against sri lanka)
Cricket West Indies (CWI) names the West Indies squads for the CG Insurance T20 International Series and CG Insurance One-Day International Series against Sri Lanka. #WIvSL
Full Squads details⬇️ https://t.co/8F1UY2fsuI pic.twitter.com/AwxKTQBuKF
— Windies Cricket (@windiescricket) February 26, 2021
या टी 20 मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिनही सामने अँटिगामधील कुलीज क्रिकेट स्टेडियममध्ये एक दिवसाच्या अंतराने खेळवले जाणार आहेत. 3 ते 7 मार्चदरम्यान या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
युनिव्हर्स बॉसचे 2 वर्षानंतर पुनरागमन
ख्रिस गेल पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळत होता. पण देशासाठी त्याने पीएसएलमधून माघार घेत मायदेशात परतणार आहे. या स्पर्धेत गेल क्वेटा ग्लैडिएटर्सकडून खेळत होता. गेलने अखेरचा टी 20 सामना 2019 मध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. तेव्हा हा माझा अंतिम सामना असेल, असं गेलने म्हटलं होतं.
9 वर्षांनंतर फिडेलचे कमबॅक
तब्बल 9 वर्षानंतर वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सचे विंडिज संघात पुनरागमन होत आहे. फिडेलने अखेरचा सामना 2012 मध्ये खेळला होता. वेगवान गोलंदाजीला आणखी धार मिळवून देण्यासाठी फिडेलला संधी देण्यात आली. मला संघात परतायचंय, अशी इच्छा फिडेलने कर्णधार कायरन पोलर्ड आणि मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्याकडे बोलून दाखवली होती. फिडेलने विंडिजसाठी एकूण 125 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.
2 नव्या चेहऱ्यांना संधी
या टी 20 मालिकेसाठी संघात 2 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. केविन सिनक्लेयर आणि अकील होसेन अशी या खेळाडूंची नावं आहेत. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. या जोरावर त्यांना संघात संधी मिळाली आहे. अकीलने बांगलादेश विरुद्ध वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच ओबेड मेकोनेएलाही संधी मिळाली आहे. याने टी 10 लीगमध्ये प्रतिस्पर्धी संघांना आपल्या खेळीने घाम फोडला होता.
अनुभवी खेळाडूंना संधी नाही
दरम्यान संघात आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर आणि सुनील नारायण या तिकडीला संधी मिळाली नाही. आंद्रे रसेल कोरोनामुळे विश्रांती घेत आहे. तर हेटमायर, रॉस्टन चेज, ओसाने थॉमस आणि कॉट्रेल फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने त्यांना संधी मिळाली नाही.
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विंडिज टीम
कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, फॅबियन एलेन, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्ड्स , आंद्रे फ्लेचर, जेसन होल्डर, अकील होसेन, केविन सिनक्लेयर, एविन लुईस, ओवेबड मॅकोए, लेंडल सिमन्स आणि रोवमॅन पॉवेल.
टी 20 सामन्याचे वेळापत्रक
पहिली टी 20 मॅच, 5 मार्च, अँटिगा
दुसरी टी 20 मॅच, 7 मार्च, अँटिगा
तिसरी टी 20 मॅच, 9 मार्च, अँटिगा
संबंधित बातम्या :
भारताच्या महिला धावपटूचं बालपणीचं स्वप्न पूर्ण, हिमा दास थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी
Yusuf Pathan | WT20 च्या फायनलमध्ये सेहवागला दुखापत, ऐनवेळी युसूफला संधी, आल्या आल्या षटकार ठोकला, पठाणचा प्रवास
(universe boss chris gayle and fidel edwards comeback in west indies t 20i team against sri lanka)