7 चौकार-11 षटकार, Urvil Patel याचं 28 चेंडूत स्फोटक शतक, गेल-पंतचा रेकॉर्ड ब्रेक
Urvil Patel Century Smat : आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये Unsold राहिलेल्या उर्वलि पटेल याने अवघ्या काही तासांनंतर इतिहास घडवला आहे. उर्विलने अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावलं आहे.
भारताचा युवा आणि स्फोटक फलंदाज उर्विल पटेल याने इतिहास घडवला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या उर्विल पटेल याने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत अवघ्या 28 चेंडूत विस्फोटक शतक ठोकलं आहे. उर्विल यासह टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच टी 20 मध्ये 27 चेंडूत वेगवान शतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होता होता राहिला. उर्विल याने या शतकासह गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेला ‘यूनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल आणि ऋषभ पंत या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एस्टोनियाच्या साहिल चौहान याने काही महिन्यांपूर्वी 27 चेंडूत सायप्रसविरुद्ध वेगवान शतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
गुजरातकडून खेळणाऱ्या उर्विल पटेल याने त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात 156 धावांचा पाठलाग करताना हा कारनामा केला. उर्विलने 7 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 28 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. उर्वलिने चौकार आणि षटकाराच्या मदतीने 18 चेंडूत 94 धावा केल्या. उर्विल फक्त शतक करुन थांबला नाही, तर गुजरातला विजयी करुन 113 धावांवर नाबाद परतला. उर्विलने 35 बॉलमध्ये 7 फोर आणि 12 सिक्ससह 322.86 च्या स्ट्राईक रेटने या नॉट ऑऊट 113 रन्स केल्या. उर्विलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 156 धावांचं आव्हान हे 10.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.
टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे फलंदाज
- साहिल चौहान (एस्टोनिया) : विरुद्ध सायप्रस, 27 चेंडू
- उर्विल पटेल (गुजरात) : विरुद्ध त्रिपुरा, 28 चेंडू
- ख्रिस गेल (आरसीबी) : विरुद्ध पुणे वॉरियर्स, 30 चेंडू
- ऋषभ पंत (दिल्ली) : विरुद्ध हिमाचल प्रदेश, 32 चेंडू
- विहान लुब्बे (नॉर्थ-वेस्ट) : विरुद्ध लिम्पोपो, 33 चेंडू
उर्विल पटेलचा कारनामा
28 balls CENTURY for Urvil Patel 🔥
Urvil Patel went UNSOLD in the IPL auction
Today, he went on to score THE FASTEST CENTURY by an Indian 🤯
This is second fastest T20 century
1. Sahil Chauhan: 27 balls v Cyprus
2. Urvil Patel: 28 balls v TRI
3.Rishabh Pant: 30 balls v HP pic.twitter.com/Zq40yG27mu
— Varun Giri (@Varungiri0) November 27, 2024
गुजरात प्लेइंग इलेव्हन : अक्षर पटेल (कर्णधार), आर्या देसाई, उर्विल पटेल (विकेटकीपर), उमंग कुमार, सौरव चौहान, हेमांग पटेल, रिपल पटेल, रवी बिश्नोई, चिंतन गजा, अरजान नागवासवाला आणि विशाल जयस्वाल.
त्रिपुरा प्लेइंग इलेव्हन : मनदीप सिंग (कर्णधार), सम्राट सूत्रधार, श्रीदाम पॉल, मणिशंकर मुरासिंग, रजत डे, शंकर पॉल, श्रीनिवास शरथ (विकेटकीपर), परवेझ सुलतान, अभिजित के सरकार, सौरभ दास आणि रियाझ उद्दीन.