USA vs BAN, 1st T20i: यूएसए 5 विकेट्सने विजयी, बागंलादेश उलटफेरची शिकार, पाकिस्तानला टेन्शन
United States vs Bangladesh 1st T20I Match Result : यूएसने मोठा उलटफेर केला आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी यूएसएला बांगलादेश विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी आहेत. त्या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, यजमान यूएसए, कॅनेडा आणि आयर्लंड हे 5 संघ ए ग्रुपमध्ये आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. त्याआधी पाकिस्तान आणि बांगलादेशला हादरवणारी बातमी समोर आली आहे. बांगलादेश उलटफेरची शिकार झाली आहे. ज्यामुळे पाकिस्तानचंही टेन्शन वाढलंय.
यूएसएची विजयी सलामी
What a win! USA win the first T20i by 5 wickets! 🤩
Stay tuned for the next match on May 23rd! 🏏#USAvBAN #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/qNXcOhjo6u
— USA Cricket (@usacricket) May 21, 2024
बांगलादेश 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी यूएसए दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान यूएसएने उलटेफर केला आहे. यूएसएने विजयी सलामी दिली आहे. यूएसएने बांगलादेशवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह 1-0 अशा फरकाने 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. तसेच या उलटफेरमुळे पाकिस्तानचेही धाबे दणाणले आहेत, कारण टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत यूएसए ए ग्रुपमध्येच आहे. त्यामुळे पाकिस्तानला यूएसएचा सामना करावा लागणार आहे.
बांगलादेशने यूएसएने विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएसने हे आव्हान 3 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरी एंडरसन आणि टीम इंडियासाठी अंडर 19 वर्ल्ड कप खेळणाऱ्या हरमीत सिंग या दोघांनी यूएसएच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 62 धावांची विजयी भागीदारी केली. कॉरीने 25 बॉलमध्ये 2 सिक्ससह नॉट आऊट 34 धावा केल्या. तर हरमीतने 13 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 33 धावा केल्या. यूएसने 19.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 156 धावा केल्या.
यूएसएकडून या दोघांआधी स्टीव्हन टेलर 28, कॅप्टन मोनाक पटेल 12, अँड्रिज गॉस 23, ॲरॉन जोन्स 4 आणि नितीश कुमार याने 10 धावा केल्या. तर बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान याने 2 विकेट्स घेतल्या. तर शोरिफूल इस्लाम आणि रिशाद हौसेन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. त्याआधी बांगलादेशने तॉहिद हृदॉयच्या 58 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या.
यूएसए प्लेईंग ईलेव्हन : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, ॲरॉन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, नितीश कुमार, अली खान, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे आणि सौरभ नेत्रावाळकर.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, सौम्या सरकार, शकीब अल हसन, तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.