USA vs BAN: बांगलादेशवर 6 धावांनी मात, अमेरिकेची ऐतिहासिक कामगिरी, 2-0 ने मालिका विजय
United States vs Bangladesh 2nd T20I : यूएसए अर्थात अमेरिका क्रिकेट टीमने बांगलादेश विरुद्ध 145 धावांचा शानदार बचाव करत 6 धावांनी सामना जिंकला. यूएसएने या विजयासह 2-0 अशा फरकाने 3 सामन्यांची मालिका जिंकली.
यूएसए क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या काही आठवड्यांआधी इतिहास रचत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यूएसएने दुसऱ्या टी 20 सामन्यात बांगलादेशवर 6 धावांनी मात करत मालिकाही जिंकला आहे.यूएसएने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. यूएसएने गुरुवारी 23 मे रोजी बांगालादेशला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशनेही या धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. मात्र अखेरच्या क्षणी यूएसएने बाजी मारली आणि इतिहास रचला. उभयसंघातील तिसरा आणि अखेरचा सामना हा शनिवारी 25 मे रोजी होणार आहे.
बांगलादेशकडून विजयी धावांचा पाठलाग करताना फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 30 धावांचं योगदान दिलं. तॉहिद हृदॉय याने 25 धावा जोडल्या. तर ताझिंद हसनने 19 रन्स केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नागी. तर चौघांना 5 पेक्षा अधिक धावांपुढे मजल मारता आली नाही. तर मुस्तफिजूर रहमान 1 धावेवर नाबाद परतला. यूएसकडून अली खान याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर आणि शैडली वान शल्कविक या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जसदीप सिंह आणि कॉरी एंडरसन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
यूएसएची बॅटिंग
दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसएने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंत मजल मारली. यूएसएकडून कॅप्टन मोनांक पटेल याने सर्वाधिक 42 धावा केल्या. एरोन जोन्स आणि स्टीव्हन टेलर या दोघांनी अनुक्रमे 35 आणि 31 अशा धावा केल्या. तर कॉरी एंडरसनने 11 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना खास योगदान देता आलं नाही. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान आणि रिशाद हौसेन या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
यूएसएकडून 145 धावांचा शानदार बचाव
THE HISTORIC MOMENT…!!! 🤯💥
USA beat Bangladesh in the T20i series – the celebrations says it all. pic.twitter.com/mE8z24mk5r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 24, 2024
यूएसए प्लेईंग ईलेव्हन : स्टीवन टेलर, मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), एंड्रीज़ गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी एंडरसन, हरमीत सिंह, शैडली वान शल्कविक, अली खान, जसदीप सिंह आणि सौरभ नेत्रावलकर.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन : तंजीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमूदुल्लाह, जेकर अली (विकेटकीपर), रिशाद हुसैन, तंजीम हसन साकिब, शोरफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.