USA vs ENG: Chris Jordan ची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडसाठी Hat Trick घेणारा पहिलाच गोलंदाज
Chris Jordan Hat Trick: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने यूएसए विरुद्ध सौरभ नेत्रवाळकर याला आऊट करत हॅटट्रिक घेतली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 23 जून हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. क्रिकेट विश्वात एकाच दिवशी 2 हॅटट्रिक घेतल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याने अफगाणिस्तान विरुद्ध हॅटट्रिक घेतली. पॅटची ही या स्पर्धेतील सलग दुसरी हॅटट्रिक ठरली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने धमाका केला. ख्रिसने केनसिंग्टन ओव्हल ब्रिजटाऊन, बारबाडोस येथे एकाच ओव्हरमध्ये हॅटट्रिकसह 4 विकेट्स घेत यूएसएला ऑलआऊट केलं. ख्रिस टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये इंग्लंडसाठी हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. ख्रिसच्या या हॅटट्रिकसह यूएसएचा डाव हा 18.5 ओव्हरमध्ये 115 धावांवर आटोपला आहे.
ख्रिस जॉर्डनने डावातील 19 व्या आणि आपल्या कोट्यातील तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर कोरी एंडरसन याला हॅरी ब्रूक याच्या हाती 29 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर दुसरा बॉल डॉट केला. तिसऱ्या बॉलवर अली खानला क्लिन बोल्ड केलं. चौथ्या बॉलवर नॉथुश केन्जिगे याला एलबीडब्लयू केलं. तर पाचव्या बॉलवर सौरभ नेत्रवाळकर याला क्लिन बोल्ड ख्रिसने हॅटट्रिक पूर्ण केली. ख्रिस टी 20 वर्ल्ड कप इतिहासात हॅटट्रिक घेणारा एकूण नववा गोलंदाज ठरला आहे. ख्रिसने 2.5 ओव्हरमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने 10 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स मिळवल्या.
त्याआधी 23 जून रोजी सकाळी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याने अफगाणिस्तान विरुद्ध हॅटट्रिक घेतली. कमिन्सने अफगाणिस्तानच्या डावातील 18 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर राशीद खानला आऊट केलं. त्यानंतर 20 व्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर करीन जनत आणि गुलबदीन नईब या दोघांना आऊट करत हॅटट्रिक घेतली. पॅटने त्याआधी बांग्लादेश विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. पॅट यासह वर्ल्ड कपमध्ये 2 हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
हॅटट्रिक विकेट
CHRIS JORDAN HAT TRICK BALL!!! #t20worldcup pic.twitter.com/jcHYAvtD0D
— Innocent Bystander (@InnoBystander) June 23, 2024
यूएसए प्लेइंग ईलेव्हन : आरोन जोन्स (कॅप्टन), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, नॉथुश केन्जिगे, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.