IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

उसेन बोल्टने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुची (Royal Challengers Banglore जर्सी परिधान करत विराट कोहलीसाठी (Virat Kolhi) खास मेसेज पाठवला आहे.

IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, 'लक्षात ठेवा...'
उसेन बोल्ट, विराट आणि डिव्हिलियर्स
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 8:29 AM

मुंबई : ऑलंम्पिक गोल्ड मेडलिस्ट उसेन बोल्टचं (Usain Bolt) क्रिकेट प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आयपीएलचा (IPL 2021) श्रीगणेशा व्हायला अवघे काही तास उरले असताना उसेन बोल्टने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुची (Royal Challengers Banglore जर्सी परिधान करत विराट कोहलीसाठी (Virat Kolhi) खास मेसेज पाठवला आहे. हा मेसेज ट्विट करताना त्याने विराट आणि आरसीबीचं वादळ ए बी डिव्हिलियर्सला ( AB De Villiers) टॅग केलं होतं. डिव्हिलियर्सनेही उसेन बोल्टची कमेंट विथ रिट्विट करुन मजा घेतली आहे. (Usain Bolt wear RCB jersey Message Virat kohli IPl 2021)

उसेन बोल्ट आरसीबीच्या जर्सीत, विराट-एबी साठी खास ट्विट

उसेन बोल्टने आरसीबीची जर्सी परिधान केलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत त्याने विराट कोहली आणि ए बी डिव्हिलियर्स यांना टॅग करुन चिमटा काढणारा मेसेज लिहिला आहे. “चॅलेंजर्स फक्त आपल्या माहितीसाठी सांगतोय, आताही जगातला सगळ्यात वेगवान धावपटू मीच आहे”, असं ट्विट बोल्टने केलं आहे.

बोल्टच्या ट्विटवर ‘एबी’चा खास रिप्लाय

बोल्टने जसं विराट-एबीची फिरकी घेणारं ट्विट केलं, तसं क्षणाचाही वेळ न दवडता डिव्हिलियर्सनेही बोल्टला मजेशीर रिप्लाय केला. “आम्हा सगळ्यांना माहितीय की आम्हाला जर एक्स्ट्रा रन्स पाहिजे असतील तर कुणाला बोलवायचं..”

आरसीबीचा उसेनला खास मेसेज

जसं उसेन आणि डिव्हिलियर्स यांच्यात ट्विटरवर मजा मस्ती झाली. तसंच आरसीबीने ट्विट करुन उसेनला भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. “लाल रंग तुला फार सूट करतोय. लवकरच भारतासाठी विमान पकड, आम्ही तुझी वाट पाहतोय”, असं ट्विट बंगळुरुने केलं आहे.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सलामाची लढत

आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा श्रीगणेशा (IPL 2021) उद्या म्हणजेच 9 एप्रिलला होणार आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात पार पडणार आहे.

(Usain Bolt wear RCB jersey Message Virat kohli IPl 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : क्वारंन्टाईनचा खेळ संपला, पंजाबचा ‘वाघ’ बाहेर आला, प्रतिस्पर्ध्यांना धडकी!

IPL 2021 : कोरोनावर मात करुन RCB चा महत्त्वाचा शिलेदार संघात परतला

VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.