IND vs AUS: भारताविरूद्धच्या कसोटीसाठी उस्मान ख्वाजाने निवडला ओपनिंग पार्टनर, स्टीव्ह स्मिथला डावललं

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला अजूनही तीन महिन्यांचा अवकाश आहे. पण या मालिकेसाठी आतापासून शा‍ब्दिक चकमक सुरु झाली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी खास रणनिती आखल्याचं दिसत आहे. असं असताना उस्मान ख्वाजाच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

IND vs AUS: भारताविरूद्धच्या कसोटीसाठी उस्मान ख्वाजाने निवडला ओपनिंग पार्टनर, स्टीव्ह स्मिथला डावललं
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 7:23 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी पाच सामने हे ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यामुळे भारताचं अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून असणार आहे, यात शंका नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला गावस्कर बॉर्डर कसोटी मालिकेत सलग दोन वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.  ऑस्ट्रेलियाने यावेळी रणनिती आखून भारताला धोबीपछाड देणार असल्याची शाब्दिक चकमक सुरु केली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्याने ओपनिंगसाठी स्टीव्ह स्मिथऐवजी दुसऱ्याच खेळाडूची निवड केली. डेविड वॉर्नरने निवृत्ती घेतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ ओपनिंगला येतो. पण भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी उस्मान ख्वाजाने ओपनिंग पार्टनर म्हणून ट्रेव्हिस हेडची निवड केली आहे. ट्रेव्हिस हेड सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असा सल्लाही दिला आहे. उस्मान ख्वाजाने फॉक्स स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ओपनिंग खूप महत्त्वाची जागा आहे. आमच्या या दशकातील सर्वात बेस्ट कसोटीपटू म्हणून स्टीव्ह स्मिथ आहे. पण त्याच्यासाठी चौथा क्रमांक योग्य असेल.

‘मला वाटतं की, स्टीव्ह स्मिथसाठी चार नंबर ही योग्य जागा आहे. मार्नस लाबुशेनने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला यावं. माझ्या मते, माझ्यासोबत ओपनिंगला ट्रेव्हिस हेड बेस्ट राहील. माझा हा विचार संघाच्या हिताचा आहे.’, असं उस्मान ख्वाजा म्हणाला. ‘स्टीव्ह स्मिथसोबत ओपनिंग करताना आम्ही काही सामने जिंकले आहेत. पण हव्या तितक्या धावा केलेल्या नाहीत. जर सर्वकाही स्मिथच्या बाजूने घडलं तर विजय पक्का असतो’, असंही उस्मान ख्वाजाने पुढे सांगितलं. ‘ट्रेव्हिस हेडचा फॉर्म पाहता त्याला संघात घेण्याचा निर्णय निवडकर्त्यांचा असेल. पण मला ओपनर म्हणून निवडण्याची संधी मिळाली तर हेड यासाठी योग्य राहील.’, असं उस्मान ख्वाजा म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना हा हायव्होल्टेज असेल यात शंका नाही. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पण ऑस्ट्रेलियात भारतीय संघ कशा पद्धतीने कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. सध्या भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबरच्या शेवटी मालिका होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.