Video : रिंकू सिंह याने पुन्हा एकदा करून दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये केला षटकारांचा वर्षाव
Rinku Singh : रिंकू सिंह आयपीएल 2023 मध्ये सलग मारलेल्या पाच षटकारांमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात स्थान मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्याने षटकार ठोकत आपली छाप पाडली आहे.
मुंबई : रिंकू सिंह है तो मुमकीन है..! आयपीएलमधील खेळीमुळे ठाम विश्वास बसला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी रिंकू सिंह सामन्याचं गणित बदलू शकतो असा क्रीडाप्रेमींना विश्वास आहे. हा विश्वास रिंकू सिंह आता खरा ठरवून दाखवत आहे. उत्तर प्रदेश प्रीमियर लीगमध्ये रिंकू सिंह याने करून दाखवलं आहे. या लीगमध्ये रिंकू सिंह मेरठ मेवरिक्स या संघाकडून खेळत आहे. या संघाचा सामना गुरुवारी काशी रुद्रास संघासोबत झाला. रोमांचक असा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला आणि यात रिंकू सिंह याने कमाल दाखवली. आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे रिंकू सिंह याच्या आयपीएलमधल्या षटकरांची आठवण ताजी झाली आहे. मेरठ मेवरिक्स आणि काशी रुद्रास या संघांमध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला. काशी रुद्रासने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात गडी गमवून 181 धावा केल्या. तर मेरठ मेवरिक्सने 4 गडी गमवून तितक्याच धावा केल्या. यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
रिंकू सिंह याने सुपर ओव्हरमध्ये करून दाखवलं
सुपर ओव्हरमध्ये काशी रुद्रास संघाने प्रथम फलंदाजी करतानात एक गडी गमवून 16 धावा केल्या. मेरठकडून रिंकू फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मग काय लेफ्ट आर्म स्पिनर योगेंद्र दोयला याला एकाच षटकात तीन षटकार ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या चेंडूवर कोणतंही धाव घेता आली नाही. त्यानंतर रिंकू सिंह याने सलग तीन षटकार ठोकले. तसेच दोन चेंडू शिल्लक ठेवले.
View this post on Instagram
रिंकू सिंह यांच्या खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याची आठवण झाली. गुजरात विरुद्ध खेळताना रिंकू सिंह याने यश दयालच्या शेवटच्या षटकावर सलग पाच षटकार ठोकले आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
भारतासाठी अशीच खेळी केली होती
आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये डेब्यू करणाऱ्या रिंकू सिंह याला फलंदाजीची संध मिळाली नव्हाती. पण दुसऱ्या सामन्यात त्याने 21 चेंडूत 38 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे संघाला 185 धावा गाठल्या होत्या. यावेळी त्याने तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले होते. शिवम दुबे सोबत शेवटच्या षटकात आक्रमक खेळी केली होती.