Virat-Anushka Love Story : पहिल्या भेटीतच संताप, मैत्री आणि लग्न, अशी आहे विराट-अनुष्काची लव्हस्टोरी

'व्हॅलेंटाईन विकला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वांनाच 'व्हॅलेंटाईन डे चे वेध लागले आहेत. या निमित्ताने आपण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची लव्ह स्टोरी आपण जाणून घेणार आहोत.

Virat-Anushka Love Story : पहिल्या भेटीतच संताप, मैत्री आणि लग्न, अशी आहे विराट-अनुष्काची लव्हस्टोरी
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:51 PM

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फार जुनं आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर अखेर लगीनगाठ बांधली. दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत लग्न केलं. त्यानंतर भारतात परतल्यावर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत जंगी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. व्हेलेंटाईन वीकला अवघे काही दिवस राहिले आहेत. या व्हेलंटाईन वीकच्या निमित्ताने या दोघांनी लव्हस्टोरी कशी होती, हे आपण जाणून घेणार आहोत.

पहिली भेट कशी झाली?

विराट आणि अनुष्काच्या पहिल्या भेटीचा किस्सा अगदी भन्नाट आहे. दोघेही एका जाहिरातीनिमित्त पहिल्यांदा 2013 मध्ये भेटले होते. पहिली भेटीत मी फार घाबरलो होतो. ही भीती नाहीशी करण्यासाठी आणि अनुष्कासोबत बोलण्यासाठी जोक मारला होता. जाहिरातीदरम्यान अनुष्का विराटपेक्षा उंच दिसत होती. यावर विराटने जोक केला. “तुला वाटत नाही का तु फार उंच हिल्स घालतेस”, असं विराट म्हणाला.

विराटच्या या जोकवर अनुष्काचा पारा चढला. “एक्सक्यूज मी”, अशा 2 शब्दातच अनुष्काने आपला राग व्यक्त केला. अनुष्काच्या या प्रतिक्रियेमुळे भलतीच स्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

हे सुद्धा वाचा

अनुष्काला फ्लाइंग किस

विराटने 2014 मध्ये शतक ठोकलं. या सामन्याला अनुष्काही उपस्थित होती. विराटने सेंच्युरी पूर्ण केल्यानंतर अनुष्काच्या दिशेने पाहिलं. भर मैदानात विराटने अनुष्काला फ्लाईंग किस दिलं. या मॅचनंतर विराट-अनुष्का जवळ आले. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मग ‘बँड बाजा बारात’.

कन्यारत्न

लग्नाच्या 4 वर्षांनी दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं.

कमाई

विराट-अनुष्का दोघांची कमाईही जबरदस्त आहे. जीक्यू इंडियन मॅगजीननुसार, विराटची एकूण संपत्ती ही 900 कोटींची आहे. तर अनुष्काकडे 350 कोटींची संपत्ती आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.