Vamika Virat Kohli : विराटकडून लेक वामिकाचा फोटो शेअर, पोस्ट व्हायरल

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) 11 जानेवारी ही तारीख फार विशेष आहे.

Vamika Virat Kohli : विराटकडून लेक वामिकाचा फोटो शेअर, पोस्ट व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 11:19 PM

Virat Kohli Share Daughter Vamika Photo : टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याची लेक वामिकासोबत (Vamika Kohli) पुन्हा एकदा एक फोटो ट्विट केला आहे. विराटने काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासह वामिकाचा बीचवरील फोटो शेअर केला होता. आता यानंतर विराटने फक्त वामिकासोबतचा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. (vamika kohli 2nd birthday father virat tweet special photo on social media)

विराट आणि अनुष्का शर्मासाठी आजचा म्हणजेच 11 जानेवारी ही तारीख फार विशेष आहे. आजच्याच दिवशी विराट बाप आणि अनुष्का आई झाली होती. आजपासून 2 वर्षांपूर्वी वामिकाचा जन्म झाला होता. विराटने या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वामिकासोबतचा गोड फोटो शेअर केलाय.

हे सुद्धा वाचा

विराटने शेअर केलेल्या या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाहीये. मात्र वामिका विराटच्या छातीवर डोकं ठेवून असल्याचं दिसतंय. तर विराट वामिकाकडे प्रेमाने पाहतोय. “माझ्या काळजाचा तुकडा 2 वर्षांचा झाला”,असं कॅप्शन विराटने या फोटोला दिलंय.

तसेच अनुष्कानेही वामिकासोबतचा फोटो शेअर केला. वामिका या फोटोत अनुष्काच्या हातात दिसून येतेय. “2 वर्षांपूर्वी माझं हृदय आणखी मोठं झालं”, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलंय.

विराट आणि अनुष्काने आयपीएल 2020 दरम्यान एक फोटो शेअर करत आई-वडील होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. विराट यानंतर भारतात परतला होता. वामिकासोबत क्षण घालवण्यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला होता.

आयसीसी रँकिगमध्ये विराटला फायदा

विराटला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत 113 धावांची शतकी खेळी केली. विराटला या खेळीचं बक्षिस मिळालं. आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय रँकिमध्ये विराटला 2 स्थानांचा फायदा झाला. विराट 8 व्या स्थानावरुन 6 व्या स्थानी पोहचला.

दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा गुरुवारी 12 जानेवारीला कोलकातामधील ईडन गार्डमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.