IPL 2022, RCB vs RR, Purple Cap : पर्पल कॅपच्या टेबलमध्ये वानिंदूने कुलदीपला टाकलं मागे, जाणून घ्या सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या खेळाडुंविषयी

काल झालेल्या बंगलोर विरुद्ध राजस्थानच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. वाचा सविस्तर

IPL 2022, RCB vs RR, Purple Cap : पर्पल कॅपच्या टेबलमध्ये वानिंदूने कुलदीपला टाकलं मागे, जाणून घ्या सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या खेळाडुंविषयी
वानिंदू हसरंगाची आगेकूचImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 7:38 AM

मुंबई :दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. या टेबलमध्ये रोज सामन्यानंतर बदल होत असतो. काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने (RR) रॉयल विजय मिळवला. यावेळी राजस्थानने बंगलोरवर 29 धावांनी विजय मिळवला. रियान परागमुळे राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चं डाव 115 धावात आटोपलं. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय.

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 18 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजन आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 15 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो यांनी 14 विकेट आयपीएलच्या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दरम्यान, चौथ्या स्थानी वानिंदू हसरंगाने आगेकूच केली असून त्याने तेरा विकेट घेतल्या आहेत.  तर पाचव्या स्थानी कुलदीप यादव गेलाय. त्याने देखील तेराच विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

मैदानावर राडा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा गोलंदाज हर्षल पटेल आणि रियान परागमध्ये मैदानावर जोरदार वादावादी झाली. रियान परागने शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 18 धावा लुटल्या. त्यामुळे हर्षल पटेलचा पारा अधिकच चढला. रियान पराग डाव संपल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. त्यावेळी हर्षल पटेल काहीतरी बोलला म्हणून तो मागे फिरला. दोघांची शाब्दीक बाचबाची सुरु होती. तितक्यात हर्षल पटेल धावून रियानच्या अंगावर गेला. पण राजस्थान एका खेळाडूने मध्यस्थी करत हर्षलला थांबवलं व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.