IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट मॅचवेळी टीम इंडियाच्या स्टार बॉलरचा झटकापटकी निवृत्तीचा निर्णय
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरू असताना एका स्टार खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने इंग्लंडचा खेळाडू स्टुअर्ड ब्रॉडचं नाक फोडलं होतं, कोण आहे घातक खेळाडू?
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका असणार आहे. यामधील आता टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने विजय मिळवला आहे. आता मालिका 1-1 ने बरोबरीत असून तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच टीम इंडियाच्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
कोण आहे तो खेळाडू?
टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वरूण अॅरोन आहे. 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत वरुण अरुणने 65 सामने खेळले आणि168 विकेट्स घेण्यात त्याने घेतल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला जास्त दिवस आंतरराष्ट्रीय संघात आपलं स्थान टिकवत आलं नाही. टीम इंडियाठी फ्कत 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्त्व केलं होतं.
इंग्लंडच्या खेळाडूचं फोडलेलं नाक!
2014 साली टीम इंडियाकडून खेळताना आपल्या बॉलिंगवर त्याने इंग्लंडचा खेळाडू ब्रॉडचं नाक फोडलं होतं. वरूण 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याची निवड समितीने दखल घेतली होती. मात्र दुखापतीमुळे संघाच्या बाहे बसावं लागलं होतं.
दरम्यान, 2008 पासून मी रेड बॉल क्रिकेट खेळत आलो आहे. वेगवान गोलंदाजीमुळे मला अनेक दुखापती झाल्या आहेत. मात्र आता मला शरीर साथ देत नसल्याने मी निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं वरूण अॅरोन याने म्हटलं आहे.