KL Rahul Selection : ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामने आणि वनडे सीरीजसाठी टीम जाहीर झाली आहे. टीम इंडियात पुन्हा एकदा केएल राहुलला स्थान मिळालय. खरंतर केएल राहुलची कामगिरी खूपच खराब आहे. त्यामुळे त्याच्या निवडीवर अनेकांना आश्चर्य वाटतय. वेंकटेश प्रसाद, तर सातत्याने केएल राहुलच्या टीममधील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. केएल राहुलमुळे शुभमन गिलसह अन्य टॅलेंटेड खेळाडूंवर अन्याय होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. केएल राहुलची टीममध्ये निवड झाल्यानंतर वेंकटेश प्रसाद यांनी काही आकडे सादर केलेत. या आकड्यांवरुन वेंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलपेक्षा शिखर धवनची कामगिरी किती चांगली आहे, ते दाखवून दिलय. वास्तव हे आहे की, शिखर धवन आज क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटपैकी एकाही टीममध्ये नाहीय.
आकडे दाखवून पोल-खोल
नागपूर त्यानंतर दिल्ली कसोटीत केएल राहुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यावर वेंकटेश प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन टि्वटरवर त्यांचा काही दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंसोबत वादविवाद झाला. आता केएल राहुलची बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीममध्ये निवड झालीय. त्यावेळी वेंकटेशन प्रसाद यांनी आकडे दाखवून राहुलची पोल-खोल करण्याचा प्रयत्न केलाय.
There is a view that KL Rahul has an outstanding overseas Test record. But stats speak otherwise. He has a test avg of 30 overseas in 56 innings. He has scored 6 overseas centuries but followed it up with a string of low scores that’s why averaging 30. Let’s look at a few others pic.twitter.com/MAvHM01TcY
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 20, 2023

Shikhar Dhawan has the best overseas average amongst recent openers. Avg of nearly 40 with 5 100’s. Though he too hasn’t been consistent in Test but had Outstanding centuries in SL and NZ, plus a much better home record. pic.twitter.com/rH94R0a3A0
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 20, 2023
दोघांमध्ये सर्वोत्तम कोण?
वेंकटेश प्रसाद यांनी लेटेस्ट टि्वटमध्ये केएल राहुल आणि शिखर धवन यांचे आकडे समोर ठेवलेत. दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओपनर म्हणून कोणाची कामगिरी उजवी आहे? ते प्रसाद यांनी सांगितलय. प्रसाद यांनी आकड्यांच्या माध्यमातून केएल राहुलवर निशाणाच साधला नाही, तर आपल्या स्टाइलमध्ये सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. शिखर धवन केएल राहुलपेक्षा चांगला ओपनर असल्याचं सांगितलं.
कोणाची कामगिरी सरस?
मायदेशात टेस्ट मॅच असो किंवा परदेशात केएल राहुलपेक्षा शिखर धवनची कामगिरी सरस आहे. त्याची सरासरी बेस्ट आहे. राहुलपेक्षा शिखर धवनचे आकडे चांगले आहेत. असं असताना शिखर धवन टीमच्या बाहेर आणि राहुल इन टीम कसा?