Retirment | आयसीसीचे 3 अवॉर्ड जिंकलेल्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का
Cricket Retirement | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीचा 3 वेळा पुरस्कार जिंकलेल्या दिग्गजाने निवृत्ती जाहीर केली आहे.
मुंबई | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने रांचीतील चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकली. त्यानंतर आत मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गजाने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचा निरोप सामना खेळून निवृत्त होणार असल्याचं या दिग्गजाने जाहीर केलं आहे. या दिग्गजाने आयसीसीचे 3 पुरस्कार जिंकले आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिकेनंतर सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेआधी न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू निल वॅगनर याने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचं या दिग्गजाने स्पष्ट केलंय.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज अंपायर मराईस इरास्मस हे निवृत्त होणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचं मराईस यांनी स्पष्ट केलंय. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना हा वेलिंग्टनमधील बेसिन रिजर्व्ह येथे खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मराईस इरास्मस हे आयसीसीच्या एलीट पॅनेलचे सदस्य आहेत. इरास्मस यांच्या निवृत्तीमुळे आयीसीसी आणि क्रिकेटवर मोठा परिणाम पडणार आहे. इरास्मस यांच्यानंतर एड्रियन होल्डस्टॉक हे आयसीसीच्या एलीट पॅनेलमध्ये एकमेव दक्षिण आफ्रिकी पंच राहतील.
मराईस इरास्मस यांची निवृत्तीची घोषणा
Marais Erasmus officiating in his final international match between New Zealand and Australia.
– He made his umpiring debut 18 years back, one of the greatest umpires! 👏❤️ pic.twitter.com/lcqGuJd7Rl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 29, 2024
मराईस इरास्मस यांची कारकीर्द
मराईस इरास्मस यांनी आपल्या कारकीर्दीत 80 कसोटी, 124 एकदिवसीय आणि 43 टी 20 सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. तसेच मराईस इरास्मस यांना त्यांच्या कामगिरीसाठी आयसीसीने तब्बल 3 वेळा अंपायर ऑफ द इयर पुरस्कारने सन्मानित केलंय. इरास्मस यांना 2016, 2017 आणि 2021 मध्ये सन्मानित केलं होतं.