श्रेयस अय्यरचा तडाखा, VHT स्पर्धेत दुसरं शतक, 16 चौकार-4 षटकारांसह 134 धावांची खेळी
Shreyas Iyer Century : मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार श्रेयस अय्यर याने विजय हजारे ट्रॉफीतील यंदाच्या हंगामात एकूण दुसरं शतक झळकावलं आहे.
मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नववर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. श्रेयसने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शतक ठोकलं आहे. श्रेयसने अहमदाबादमधील गुजरात कॉलेज ग्राउंडवर पुद्देचरीविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं आहे. श्रेयसने राउंड 6 मधील सामन्यात ही कामगिरी करुन दाखवलीय. श्रेयसचं हे या हंगामातील दुसरं शतक ठरलं. श्रेयसने निर्णायक क्षणी ही खेळी करत मुंबईची लाज वाचवली आणि संकटमोचकाची भूमिका बजावली. श्रेयसने केलेल्या खेळीमुळे मुंबईला 300 धावांच्या जवळ जाता आलं.
मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मुंबईने श्रेयसच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 9 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 290 धावा केल्या. श्रेयसने या हंगामातील पहिल्या आणि त्यानंतर आता सहाव्या सामन्यात शतक केलं. श्रेयसने पहिल्या सामन्यात कर्नाटकविरुद्ध शतक झळकावलं होतं. श्रेयसने 114 धावांची खेळी केली होती.
श्रेयसने डाव सावरला
मुंबईची 5 बाद 82 अशी नाजूक स्थिती झाली होती. मुंबई अडचणीत सापडली होती. मात्र त्यानंतर श्रेयसने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. श्रेयसने 133 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 16 फोरसह नॉट आूट 134 रन्स केल्या. श्रेयसने सिक्स आणि फोरसह एकूण 20 बॉलमध्ये 88 रन्स केल्या.
मुंबईकडून श्रेयस व्यतिरिक्त सिद्धार्थ लाड याने 34 आणि अर्थव अंकोलेकर याने 43 धावांची खेळी केली. तसेच शार्दूल ठाकुरने 16 आणि सूर्यांश शेंडगेने 10 धावा जोडल्या.
श्रेयस अय्यरचा शतकी झंझावात
CAPTAIN SHREYAS IYER – 137*(133)
– Mumbai were 80 for 5 then 225 for 9 and ended on 290 for 9 from 50 overs in Vijay Hazare Trophy.
Thanks to the main man, Shreyas Iyer, only player to score more than 50 in this innings 👌 pic.twitter.com/zXwZKG0sMy
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2025
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.
पुद्दुचेरी प्लेइंग ईलेव्हन : अरुण कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), नयन श्याम कांगायन, मोहम्मद आकिब जावाद, संतोष रत्नपारखे, जशवंत श्रीराम, अमन हकीम खान, अंकित शर्मा, सिदक गुरविंदर सिंग, गौरव यादव, सागर उदेशी आणि आकाश करगावे.