VHT : वरुण चक्रवर्थीचा ‘पंच’ व्यर्थ, राजस्थानची रंगतदार सामन्यात तामिळनाडूवर 19 धावांनी मात
Rajasthan vs Tamil Nadu 2nd Preliminary quarter final : राजस्थानने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या प्रीलीमिनरी क्वार्टर फायनल मॅचमध्ये तामिळनाडूवर 19 धावांनी मात केली.
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून तामिळनाडू क्रिकेट टीमचा पत्ता कट झाला आहे. राजस्थानने रंगतदार झालेल्या प्रीलीमिनरी क्वार्टर फायनल मॅचमध्ये तामिळनाडूवर 19 धावांनी मात केली. राजस्थानने यशस्वीपणे 267 धावांचा बचाव केला. राजस्थानने या विजयासह क्वार्टर फायलनमध्ये धडक मारली आहे. राजस्थानने तामिळनाडूला विजयासाठी 268 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र तामिळनाडूचा डाव हा 47.1 ओव्हरमध्ये 248 धावांवर आटोपला. तामिळनाडूसाठी 5 विकेट्स घेणाऱ्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याची मेहनत वाया गेली.
तामिळनाडूची बॅटिंग
तामिळनाडूसाठी ओपनर आणि विकेटकीपर एन जगदीशन याने सर्वाधिक धावा केल्या. जगदीशन याने 52 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. तर इतरांनाही धावा केल्या मात्र त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. तामिळनाडूकडून विजय शंकर याने 49 धावांतं योगदान दिलं. बाबा इंद्रजीथ याने 37 तर मोहम्मद अलीने 34 धावा जोडल्या. वरुण चक्रवर्थी याने 18, कॅप्टन आर साई किशोरने 13 तर तुषार रहेजाने 11 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. राजस्थानसाठी अमन शेखावत याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अनिकेत चौधरी आणि कुकना अजय सिंह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
त्याआधी तामिळनाडूने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने 47.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 267 धावा केल्या. अभिजीत तोमर याने सर्वाधिक 111 धावा केल्या. कॅप्टम महिपाल लोमरुरने 60 धावांचं योगदान दिसलं. तर कार्तिक शर्माने 35 रन्स केल्या. तर तामिळनाडूसाठी वरुण चक्रवर्थी याने 52 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर संदीप वॉरियर आणि साई किशोरने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर त्रिलोक नागने 1 विकेट मिळवली.
राजस्थानचा 19 धावांनी विजय
Rajasthan enter quarterfinals 👏
They defend 267, bowling Tamil Nadu out for 248 👌👌
An excellent bowling and fielding performance 💪#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/pSVoNE63b2 pic.twitter.com/USnXSEOXU5
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2025
तामिळनाडू प्लेइंग ईलेव्हन : आर साई किशोर (कर्णधार), तुषार रहेजा, एन जगदीसन (विकेटकीपर), बूपती कुमार, बाबा इंद्रजीथ, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद अली, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि त्रिलोक नाग.
राजस्थान प्लेइंग ईलेव्हन : महिपाल लोमरोर (कर्णधार), अभिजीत तोमर, सचिन यादव, कार्तिक शर्मा (विकेटकीपर), दीपक हुडा, समरपीत जोशी, अमन सिंग शेखावत, मानव सुथार, कुकना अजय सिंग, खलील अहमद आणि अनिकेत चौधरी.