Virat Kohli Gautam Gambhir : विराट कोहलीच्या आधी मोहम्मद सिराजनेच केला होता खरा मॅटर, ‘तो’ व्हिडीओ आला समोर!
LSG vs RCB Video : विराट आणि गौतमचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. मात्र त्याआधी सामन्यामध्ये आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील झालेल्या सामन्यात घमासान पाहायला मिळालं. एखद्या युद्धभूमीसारखं दोन्ही संघांम्ध्ये सामना पाहायला मिळाला. स्टार खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे भर मैदानात एकमेकांना भिडलेले दिसले. आयपीएलमध्ये या दोघांची भिडण्याची ही दुसरी वेळ आहे. विराट आणि गौतमचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. मात्र त्याआधी सामन्यामध्ये आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
लखनऊ संघ आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची खराब अवस्था झाली होती. सामन्याच्या 17 व्या षटकामध्ये आरसीबीचा मुख्य गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या ओव्हरवेळी खरी तापातापी झालेली. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ-
Miyan is also on fire ??❤️#siraj #RCBVSLSG #ViratKohli #gautam #Naveen #AmitMishra #naveen pic.twitter.com/jkWrN3fcId
— SD Arshad (@SDArshad17) May 1, 2023
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की 17 व्या ओव्हरमध्ये सिराजने शेवटचा चेंडू टाकल्यावर त्याने लखनऊच्या नवीन उल हक याला खुन्नस दिली होती. नवीनची बॅट क्रिजमध्ये असतानासुद्धा सिराजने टसल देत चेंडू स्टम्पवर मारला होता. इथून पुढे सामन्यात रंगत तर आली सोबतच खुन्नस पाहायला मिळाली. सामना झाल्यावर हस्तांदोलन करताना झालेली झकाझक पूढे त्यानंतर केवढा मॅचर झाला हे सर्वांनी पाहिलेलंच आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.