Karun Nair : 5 षटकार-9 चौकार, करुण नायरची चाबूक खेळी, पाहा व्हीडिओ
Karun Nair Batting : विदर्भाच्या कर्णधाराने विजय हजारे ट्रॉफीतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात नाबाद 88 धावांची चाबूक खेळी केली.
विजय हजारे ट्रॉफीत टीम इंडियाचा त्रिशतकवीर करुण नायर याचा झंझावात सुरुच आहे. या स्पर्धेत सलग 5 शतकं झळकावणाऱ्या करुणने दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात विस्फोटक खेळी केली. करुणने विदर्भविरुद्ध 44 बॉलमध्ये 88 धावांची स्फोटक खेळी केली. करुणच्या या फिनिशींग टचमुळे विदर्भाला मोठी धावसंख्या उभारता आली. विदर्भाने 50 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 380 धावा केल्या. करुण 88 धावांवर नाबाद परतला. करुण शतकापासून फक्त 12 धावांपासून दूर राहिला. करुणने 200 च्या स्ट्राईक रेटनेही ही खेळी केली.
करुणचा झझंवात
करुणने शेवटच्या काही षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. करुणने महाराष्ट्रच्या गोलंदाजांना झोडत धावांचा पाऊस पाडला. करुणच्या या खेळीमुळे विदर्भाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 92 धावा जोडल्या. करुणने या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. करुणने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 14 बॉलमध्ये 66 रन्स केल्या. करुणने या हंगामात 5 शतकं लगावली आहेत. मात्र सहाव्या शतकापासून तो 12 धावांनी दूर राहिला.
कमबॅकसाठी दावा आणखी मजबूत
दरम्यान करुण नायर टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर आहे. मात्र करुणने विजय हजारे ट्रॉफीतील यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे निवड समिती विजय हजारे ट्रॉफी फायनलनंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. करुणने 88 धावा करत आपला दावा आणखी मजबूत केला आहे. आता निवड समिती करुणला संधी देतं का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
करुण नायरची चाबूक खेळी
Relive 🎥
Vidarbha captain Karun Nair’s blistering finishing knock of 88* off 44 against Maharashtra 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/AW5jmfoiE1 pic.twitter.com/jQNnxssJVb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 16, 2025
महाराष्ट्र प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटकीपर), सत्यजीत बच्छाव, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी आआमि प्रदीप दधे.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, अपूर्व वानखडे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, पार्थ रेखाडे, यश ठाकूर आणि दर्शन नळकांडे.