VIDEO : World Cup Final मधील अर्चना देवीची कॅच पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, Wow, जबरदस्त

| Updated on: Jan 30, 2023 | 11:22 AM

महिला टीम इंडियाने फायनलमध्ये जबरदस्त बॉलिंग आणि बॅटिंग केली. त्यामुळे इंग्लंडची हालत खराब झाली. एका कॅचमधून टीम इंडियाची फिल्डिंग किती जबरदस्त होती, ते दिसून आलं.

VIDEO : World Cup Final मधील अर्चना देवीची कॅच पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, Wow, जबरदस्त
u 19 world cup final
Image Credit source: Getty Images
Follow us on

U-19 WC Final : पहिली मोठी टुर्नामेंट आणि थेट फायनलमध्ये खेळण्याची संधी. प्रत्येकाला इतकं सौभाग्य मिळत नाही. मिळालेल्या संधीच सोनं करणं आवश्यक असतं. त्याचवेळी चॅम्पियन बनता येतं. दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिल्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी मिळालेली संधी अचूकतेने साधली. महिला टीम इंडियाने फायनलमध्ये जबरदस्त बॉलिंग आणि बॅटिंग केली. त्यामुळे इंग्लंडची हालत खराब झाली. एका कॅचमधून टीम इंडियाची फिल्डिंग किती जबरदस्त होती, ते दिसून आलं.

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफस्ट्रूम येथे रविवारी 29 जानेवारीला फायनल सामना खेळला गेला. टीम इंडियाने पहिली गोलंदाजी केली. कॅप्टन शेफाली वर्माने टॉस जिंकून हा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. टीमची वेगवान गोलंदाज तितास साधू आणि स्पिनर अर्चना देवीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला.

अर्चनाची जबरदस्त फिल्डिंग

डावखुरी फिरकी गोलंदाज अर्चना देवीने दोन विकेट काढून कमाल केली. तिने टीम इंडियासाठी चांगली सुरुवात केली. 12 व्या ओव्हरमध्ये तिने कमालीची फिल्डिंग केली. स्पिनर पार्श्वी चोपडाचा पहिला चेंडू इंग्लंडच्या रायना मॅक्डॉनल्डने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागून एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने गेला.

एकाहाताने जबरदस्त कॅच

कॅच दिसताच अर्चना देवीने हवेर सूर मारुन जबरदस्त कॅच पकडली. चेंडू जास्त उंचीवर नव्हता. अर्चना देवी डाइव्ह मारुन एकाहाताने जबरदस्त कॅच घेतली.


थर्ड अंपायरची मदत

ही कॅच पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसला नाही. अंपायरने सुद्धा कॅचची पुष्टी करण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेतली. थर्ड अंपायरने रिप्ले पाहताच निर्णय देण्यासाठी वेळ लावला नाही. इंग्लंडची बॅट्समनने पॅव्हेलियनची वाट धरली होती.

68 रन्सवर ऑलआऊट

गोलंदाजीत अर्चना देवी भारतीय बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं. इंग्लंडची संपूर्ण टीम फक्त 68 रन्समध्ये ऑलआऊट झाली. भारताकडून तीतास साधुने पहिल्या चार ओव्हरमध्ये सुपर्ब गोलंदाजी केली. तितासने 4 ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 2 विकेट काढल्या. अर्चनाने 2, पार्श्वी चोपडाने 2, कॅप्टन शेफाली वर्मा, सोनम यादव आणि मन्नत कश्यपने प्रत्येकी एक विकेट घेतला.