VIDEO : मी म्हातारा दिसतो का? पत्रकाराच्या एका प्रश्नावर बाबर आझमचा भडका, नेमकं काय झालं? जाणून घ्या…

Asia World cup 2022 : पाकिस्तानला याच महिन्यात आशिया कप टी-20मध्ये सहभागी व्हायच आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर पाकिस्तानचा संघ 28 ऑगस्टला पहिला सामना भारताविरुद्ध खेळणार आहे.

VIDEO : मी म्हातारा दिसतो का? पत्रकाराच्या एका प्रश्नावर बाबर आझमचा भडका, नेमकं काय  झालं? जाणून घ्या...
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:13 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानचा (Pakistan Cricket Team) बाबर आझम (Babar Azam) हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या एकदिवसीय आणि टी-20 (T-20) मध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याचवेळी त्याचे स्थान कसोटी क्रमवारीत 3 व्या क्रमांकावर आहे. सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल तीन फलंदाजांमध्ये राहिलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा एकमेव फलंदाज आहे. अलीकडेच श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनं म्हणाला होता की, बाबरमध्ये जो रूटची जागा घेऊन नंबर वन कसोटी फलंदाज होण्याची पूर्ण क्षमता आहे. नुकत्याच श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बाबर यांच्या पराभवावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला पत्रकारांनी असंही विचारलं की तो एक फॉर्मेट सोडण्याचा विचार करत आहे आणि त्याचा मोहम्मद रिजवान आणि शाहीन शाह आफ्रिदी सारख्या खेळाडूंना फायदा होईल का? यावर बाबर यांनी मजेशीर उत्तर दिलंय.

बाबर आझमची पत्रकार परिषद

‘मी म्हातारा झालो असं का वाटतं…’

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, हे तुमच्या फिटनेसवर अवलंबून आहे. सध्या आमचा ज्या प्रकारचा फिटनेस आहे. त्यामुळे आम्ही दोन फॉरमॅटमध्ये येऊ असे वाटत नाही. मी म्हातारा झालो असे का वाटते? किंवा आपण सर्व वृद्ध आहोत? यावर पत्रकारानं उत्तर दिलं. भार जास्त होत आहे, नाही का? यावर बाबर आझम हा म्हणाला की, मला तसं वाटत नाही. भार जास्त असेल तर त्यानुसार फिटनेस वाढवू, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना बाबर आझम याचा चांगलाच भडका उडाल्याचं दिसून आलं. पत्रकाराच्या एका प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तराची क्रिकेटविश्वात सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याच्या उडालेल्या भडक्याबद्दल बोललं जातं आहे.

पहिला सामना भारताविरुद्ध

आता पाकिस्तान क्रिकेट संघाला याच महिन्यात आशिया कप टी-20 स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी, पाकिस्तानचा संघ 28 ऑगस्टला पहिला सामना भारताविरुद्ध खेळणार आहे.

आशिया कप T20 साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज डहानी आणि उस्मान कादिर.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.