Video : ‘ज्युनियर मलिंगा’ने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली, ऋद्धिमानचं अकरावं अर्धशतक, पाहा Highlights Video
पाथीरानाने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला अल्बडब्ल्यू बाद केले. शुभमन 17 चेंडूत 18 धावा करू शकला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजचा 62 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या. अशा स्थितीत 134 धावांचे लक्ष्य गुजरातनं 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातने 10वा सामना 7 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 53, एन जगदीसनने नाबाद 39, मोईन अलीने 21 आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 7 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने दोन तर राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गिल 18 धावा करून बाद झाला. मॅथ्यू वेड 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्या 7 धावा करून बाद झाला. रिद्धिमान साहा 67 आणि डेव्हिड मिलर 15 धावा करून नाबाद परतला.
Match 62. Gujarat Titans Won by 7 Wicket(s) https://t.co/6J3VYmaJ3Q #CSKvGT #TATAIPL #IPL2022
हे सुद्धा वाचा— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
Near-perfect win against mighty CSK ??
Well done boys ?#SeasonOfFirsts #AavaDe #CSKvGT pic.twitter.com/iMOlSIYxG2
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 15, 2022
ज्युनियर मलिंगाने पहिल्याच बॉलवर घेतली विकेट
आठव्या षटकात श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथिशा पाथिराना गोलंदाजीसाठी आला. ‘ज्युनियर मलिंगा’ असेही संबोधले जाते. पाथीरानाने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला LBW बाद केले. शुभमन 17 चेंडूत 18 धावा करू शकला.
L. B. W! ☝️
A first-ball wicket on the IPL debut for Matheesha Pathirana! ? ?#GT lose Shubman Gill in the chase.
Follow the match ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT | @ChennaiIPL pic.twitter.com/TLSn6kob65
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
गुजरातला दुसरा धक्का
12व्या षटकात 90 धावांवर गुजरातला दुसरा धक्का बसला. मोईन अलीने मॅथ्यू वेडला शिवम दुबेकडून झेलबाद केले. वेड 15 चेंडूत 20 धावा करून बाद झाला.
In the air & taken!
Moeen Ali strikes as @IamShivamDube completes the catch. ? ?#GT 2 down as Matthew Wade departs.
Follow the match ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT | @ChennaiIPL pic.twitter.com/rcR2zzWLqD
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
गुजरातला 100 च्या स्कोअरवर तिसरा धक्का
गुजरात टायटन्सला 14व्या षटकात 100 धावांवर तिसरा धक्का बसला. मथिशा पाथिरानाने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला शिवम दुबेकडून झेलबाद केले. पाथीरानाला सहा चेंडूंत सात धावा करता आल्या. पाथीरानाचे हे दुसरे यश ठरले. तत्पूर्वी त्याने शुभमनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Second success with the ball for Matheesha Pathirana! ? ?
A huge wicket for @ChennaiIPL as Hardik Pandya gets out. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/HlDuz3t3nj
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
ऋद्धिमानचे अकरावे अर्धशतक
ऋद्धिमान साहाने 42 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. साहाने आयपीएल कारकिर्दीतील अकरावे अर्धशतक झळकावले.
FIFTY for @Wriddhipops! ? ?
What a fine knock this has been by the @gujarat_titans right-hander in the chase! ? ?
Follow the match ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/qt5yEdgMWj
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
पॉईट्स टेबलची काय स्थिती?
आजच्या विजयासह गुजरातनं गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत अव्वल दोनमध्ये आपले स्थान पक्के केलं आहे. संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळायचा आहे. तो सामना गमावल्यानंतरही गुजरात संघ पहिले दोन स्थान कायम राखेल. याचाच अर्थ संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे.