Vijay Hazare Trophy | श्रीसंतची आक्रमक गोलंदाजी, रॉबिन उथप्पाची वादळी खेळी, केरळाचा बिहारवर 9 विकेट्सने शानदार विजय

रॉबिन उथप्पाची (Robin uthappa) तडाखेदार फलंदाजी आणि श्रीसंतच्या (s sreesanth) आक्रमक माऱ्याच्या जोरावर केरळने बिहारवर विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy 2021 21) विकेट्सने विजय मिळवला आहे.

Vijay Hazare Trophy | श्रीसंतची आक्रमक गोलंदाजी, रॉबिन उथप्पाची वादळी खेळी, केरळाचा बिहारवर 9 विकेट्सने शानदार विजय
रॉबिन उथप्पाची (Robin uthappa) तडाखेदार फलंदाजी आणि श्रीसंतच्या (s sreesanth) आक्रमक माऱ्याच्या जोरावर केरळने बिहारवर विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy 2021 21) विकेट्सने विजय मिळवला आहे.
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 5:07 PM

आंध्र प्रदेश : विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) रॉबिन उथप्पाच्या (Robin Uthappa) तडाखेदार खेळीच्या जोरावर केरळने बिहारवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. बिहारने केरळला विजयासाठी 149 धावांचे विजयी आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान केरळाने उथप्पाच्या वादळी खेळीच्या जोरावर 1 विकेट्स गमावून अवघ्या 8. 5 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. केरळकडून उथप्पाने 32 चेंडूत 10 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 87 धावांची विजयी खेळी साकारली. तर विष्णू विनोदने 37 तसेच संजू सॅमसनने नाबाद 24 धावांची खेळी केली. बिहाकरडून कर्णधार आशुतोष अमनने एकमेव विकेट घेतली. (vijay hazare trophy 2020 21 s sreesanth take 4 wickets robin uthappa scored 87 runs kerala beat bihar by 9 wickets)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या केरळाची धमाकेदार सुरुवात राहिली. उथप्पा आणि विनोदने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. या दोघांनी 76 धावांची सलामी भागीदारी केली. विनोद 37 धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. या दोघांनी बिहारच्या गोलंदाजीला चोप चोपला. या दरम्यान उथप्पाने आपले अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी केरळचा विजय साकारला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 रन्सची विनिंग पार्टनरशीप केली. संजू सॅमसनने 9 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 24 रन्स केल्या.

बिहारची बॅटिंग

त्याआधी केरळने टॉस जिंकून बिहारला बॅटिंगसाठी भाग पाडले. केरळाच्या गोलंदाजांनी बिहारला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. केरळने एकाही बिहारच्या फलंदाजाला मैदानात सेट होऊन दिले नाही. बिहारने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. एस श्रीसंतच्या भेदक माऱ्यासमोर बिहारचा डाव 40.2 षटकात 148 धावांवर आटोपला. केरळकडून श्रीसंतने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. श्रीसंतने 9 षटकांमध्ये 30 धावा देत 4 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे या त्याने 2 मेडन ओव्हर टाकल्या. तर जलज सक्सेनानेही 3 बळी मिळवल्या. एम डी निधेशने 2 बॅट्समनना आऊट करत चांगली साथ दिली.

केरळचा विजयी चौकार

केरळने या विजयासह या स्पर्धेतील 4 विजय साकारला आहे. यासह केरळ C ग्रृपमध्ये 16 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

उथप्पाची सातत्यपूर्ण निर्णायक कामगिरी

उथप्पा या स्पर्धेच्या सुरुवातीपासून दमदार फलंदाजी करत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात त्याने शानदार कामिगरी केली आहे. तसेच त्याने शतकही लगावलं आहे. उथप्पा आयपीएलच्या 14 व्या मोसमात चेन्नईकडून खेळणार आहे. यामुळे आयपीएल पूर्वी अशी तडाखेदार कामगिरी करत उथप्पाने चेन्नई फ्रँचायजीचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय

Icc Test Ranking | आयसीसी कसोटी क्रमवारीत अश्विन आणि रोहितची मोठी झेप, पुजारा-बुमराहची घसरण

वेस्टइंडिजचा फिरकीपटू सुनील नारायणबाबत निवड समितीचा मोठा खुलासा

(vijay hazare trophy 2020 21 s sreesanth take 4 wickets robin uthappa scored 87 runs kerala beat bihar by 9 wickets)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.