Vijay Hazare Trophy | सेहवागच्या पुतण्याचा धमाका, 9 व्या नंबरवर येऊन वादळी खेळी, तरीही टीमची बेईज्जती

मयंक डागरने (mayank dagar) 1 मार्चला मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात 20 चेंडूत 38 धावांची खेळी केली.

Vijay Hazare Trophy | सेहवागच्या पुतण्याचा धमाका, 9 व्या नंबरवर येऊन वादळी खेळी, तरीही टीमची बेईज्जती
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:01 PM

जयपूर : वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) टीम इंडियाचा आक्रमक माजी सलामीवीर. टेस्ट, वनडे असो की टी 20 तो नेहमीच आपल्या पद्धतीनेच जोरदार फटकेबाजी करायचा. सेहवाग आजही त्याच्या या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. क्रिकेट चाहत्यांना सेहवागसारख्या आक्रमक फलंदाजीचे दर्शन त्याचा पुतण्या मंयक डागरने (Mayank Dagar) सोमवारी घडवले. विशेष म्हणजे त्याने 9 व्या क्रमांकावर येत तडाखेदार फलंदाजी केली. (vijay hazare trophy 2020 21 virendra sehwag nephew mayank dagar scored 38 runs at 9th position against mumbai)

सोमवारी 1 मार्चला मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश (Mumbai vs Himachal Pradesh) यांच्यात विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विजयी धावांचे पाठलाग करताना मयंकने 20 चेंडूत 38 धावा चोपल्या. पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. मुंबईने हिमाचलचा 200 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत हिमाचलला विजयासाठी 322 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईच्या गोलंदाजांनी हिमाचलला 24. 1 ओव्हरमध्ये 121 धावांवर गुंडाळले. त्यामुळे मुंबईने मोठ्या फरकाने विजय साकारला.

20 चेंडूत 38 धावा

मयंक जेव्हा मैदानात आला तेव्हा हिमाचलचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. मयंक नवव्या क्रमांकावर खेळायला आला. हिमाचल पराभवाच्या उंबरठ्यावर होता. पण मयंकने विजयी धावांमधील अंतर कमी करण्याच्या हेतून फटकेबाजी करायला सुरुवात केली. मयंकने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 सिक्स खेचत शानदार 38 धावा चोपल्या. यासह तो हिमाचलकडून या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मयंक व्यतिरिक्त प्रवीण ठाकूरने 22, कर्णधार ऋषी धवनने 18 तर एकांत सेनने 21 धावा केल्या. या व्यतिरिक्त हिमाचलच्या एकाही बॅट्समनला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली. पहिल्या 4 विकेट्स या 49 धावांवर गेल्या होत्या. पण यानंतर सूर्यकुमार यादव, आदित्य तरे आणि शार्दुल ठाकूरने फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला. या तिकडीने तडाखेदार बॅटिंग केली. सूर्यकुमारने 91, आदित्यने 83 तर शार्दूलने 92 धावांची खेळी केली. या त्रिमूर्तीच्या जोरावर मुंबईने 321 धावांपर्यंत मजल मारली.

मयंक आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी अनसोल्ड

मयंकला आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी कोणत्याही फ्रँचायजीने खरेदी करण्यात रस दाखवला नाही. अर्थात मयंक अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईज ही 20 लाख इतकी होती. दरम्यान त्याने याआधी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे प्रतिनिधित्वही केलं आहे.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | सूर्यकुमार यादवची तडाखेदार खेळी, 15 चेंडूत चोपल्या 60 धावा, इंग्लंडला टी 20 मालिकेत पाणी पाजण्यासाठी सज्ज

Vijay Hazare Trophy | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची 92 धावांची सुस्साट खेळी, हिमाचल प्रदेशवर शानदार विजय

(vijay hazare trophy 2020 21 virendra sehwag nephew mayank dagar scored 38 runs at 9th position against mumbai)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.