Vijay Hazare Trophy 2021 | 20 वर्षीय युवा फलंदाजाचा तडाखा, सलग 4 वनडे शतकं ठोकली, संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी
देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) केरळ विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. यासह देवदत्तचं हे या स्पर्धेतील सलग चौथं (scored 4th consecutive century) शतक ठरलं. त्याने कुमार संगकाराच्या (kumar sangakara) वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.
नवी दिल्ली | विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) कर्नाटकाचं प्रतिनिधित्व करणारा फलंदाज देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडत आहे. देवदत्त या मोसमात शानदार कामगिरी करत आहे. देवदत्तने केरळ विरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात (Karnataka vs Kerala Quarter Final 2) पुन्हा एकदा जलवा दाखवला आहे. त्याने केरळ विरुद्ध खणखणीत 101 धावांची शतकी खेळी केली आहे. हे देवदत्तचं या स्पर्धेतील सलग चौथं शतक ठरलं. या शतकासह देवदत्तने श्रीलंकेचा माजी विकेटकीपर बॅट्समन कुमार संगकाराच्या (Kumar Sangakara) सलग 4 एकदिवसीय शतकांची बरोबरी केली आहे. (vijay hazare trophy 2021 Devdutt Padikkal scored 4th consecutive century equal to kumar sangakkara world record)
4th consecutive century for Devdutt Paddikal. Classy batting with superb consistency. Man for the big race.
Also 6th back to back 50+ score. Averaging over 200 in #VijayHazareTrophy2021
#VijayHazareTrophy pic.twitter.com/puIqf43U0Y
— Arka Roy (@Arka_roy1) March 8, 2021
जोरदार सुरुवात शानदार शतक
केरळने टॉस जिंकून कर्नाटकाला फलंदाजीसाठी भाग पाडले. कर्नाटकाने या संधीचं सोनं केलं. कर्नाटकाकडून रवीकुमार समर्थ आणि देवदत्त ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी अफलातून सुरुवात केली. या दोघांनी केरळच्या गोलंदाजांना चोप चोपला. दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या जोडीने तब्बल 249 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान देवदत्तने आपलं शतक पूर्ण केलं. देवदत्तने 118 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. मात्र यानंतर देवदत्त 101 धावांवर बाद झाला.
देवदत्त पडिक्कलची सलग चौथी शतकी खेळी
देवदत्तचं हे शतक या स्पर्धेतील सलग चौथं शतक ठरलं. यासह देवदत्तने संगकाराच्या वनडेमधील सलग 4 शतकं ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. देवदत्तने याआधी 24 फेब्रुवारीला ओडिसा विरुद्ध 152 धावा केल्या. 26 फेब्रुवारीला केरळ विरोधात नाबाद 126 धावा चोपल्या. तर रेल्वे विरुद्ध 28 फेब्रुवारीला नाबाद 145 धावांची खेळी केली होती.
संगकाराच्या विक्रमाची बरोबरी
श्रीलंकेचा सलामीवीर संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 4 वनडे सामन्यात 4 शतक झळकावले होते. विशेष म्हणजे संगकाराने ही कामगिरी 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केली होती. यासह संगकारा अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला होता. देवदत्तने जरी ही कामगिरी देशांतर्गत स्पर्धेत केली. मात्र देवदत्तने त्याच्यात असलेली प्रतिभा दाखवून दिली.
Mass Consistency @devdpd07 ?
673 Run In 6 Matches Including 2 Fifties And 4 Hundreds ?First Batsman To Score 600+ Runs In #VijayHazareTrophy2021 ? pic.twitter.com/xX46LyBs0o
— ? (@UsthadVirat) March 8, 2021
विजय हजारे ट्रॉफीत धावांचा डोंगर
देवदत्तने या मोसमातील 7 सामन्यात 6 सामन्यात 4 शतक आणि 2 अर्धशतकांसह 673 धावा कुटल्या आहेत.
देवदत्तची आयपीएल कारकिर्द
देवदत्तने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एकूण सर्वच म्हणजेच 14 सामने खेळला. यामध्ये त्याने 126.54 च्या स्ट्राईक रेटने तसेच 33.71 च्या सरासरीने 472 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्तची 74 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
संबंधित बातम्या :
Vijay Hazare Trophy | षटकारांचा पाऊस, शतकांची हॅटट्रिक, कोहलीच्या टीममधील देवदत्तची तडाखेदार बॅटिंग
IPL 2020, DCvs RCB : देवदत्त पडीक्कलची विक्रमी कामगिरी
(vijay hazare trophy 2021 Devdutt Padikkal scored 4th consecutive century equal to kumar sangakkara world record)