IPL लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतले नाही, ‘त्या’ खेळाडूने एकहाती फिरवला सामना

विजय हजारे चषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गोवा आणि बडोदा या दोन संघांचा सामना पार पडला. | Vishnu Solnanki

IPL लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतले नाही, 'त्या' खेळाडूने एकहाती फिरवला सामना
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 12:38 PM

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात कोणत्याही संघाने विकत न घेतल्यामुळे अनसोल्ड राहिलेल्या विष्णु सोलंकी (Vishnu Solnanki) याने विजय हजारे चषकातील सामन्यात कमाल करुन दाखविली आहे. विष्णु सोलंकी याने तडाखेबंद फलंदाजी करत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. (Vijay Hazare Trophy 2021 player who remanin unsold in IPL auction Vishnu Solnanki made fabouls inning against goa)

विजय हजारे चषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गोवा आणि बडोदा या दोन संघांचा सामना पार पडला. या सामन्यात गोव्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकांत 263 धावा केल्या. गोव्याकडून स्नेहल कोठांकरने सर्वाधिक 81 धावा केल्या. यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तर एकनाथ केरकर आणि सुयश प्रभुदेसाई यांनी अनुक्रमे 43 आणि 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बडोद्याकडून अतीत सेठ आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले. बडोद्याच्या संघाने हे लक्ष्य 48.3 षटकांत पाच गडी राखून पूर्ण केले.

विष्णु सोलंकीच्या 108 धावा ठरल्या निर्णायक

264 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याकडून विष्णु सोलंकी याने तडाखेबंद फलंदाजी केली. त्याने 132 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने शतक ठोकले. कर्णधार कृणाल पांड्या याने सोलंकीला चांगली साथ दिली. त्याने 77 चेंडूत सात चौकारांसह 71 धावा केल्या. तर यष्टीरक्षक समित पटेल याने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, या सामन्यानंतर विष्णु सोलंकीच्या नावाचीच चर्चा सुरु होती. विष्णु सोलंकी याने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही शानदार खेळ दाखवला होता.

‘त्या’ सामन्यात शेवटच्या चेंडूवर लगावला होता षटकार

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विष्णु सोळंकी याने हरियाणाच्या संघाविरुद्ध खेळताना बडोद्याला रोमांचक विजय मिळवून दिला होता. विष्णु सोळंकी हा धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. हरियाणाविरुद्धच्या त्या सामन्यात बडोद्याला शेवटच्या तीन षटकांत 29 धावांची गरज होती. मात्र, 18व्या षटकात फक्त सहा धावाच झाल्या. त्यामुळे दोन षटकांत 23 धावा, असे समीकरण तयार झाले. तर शेवटच्या षटकांत बडोद्याला विजयासाठी 18 धावा गरजेच्या होत्या.

शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर केवळ एक-एक धाव आली. यानंतर विष्णु सोलंकीने गिअर बदलत षटकार आणि चौकाराची लयलूट करत बडोद्याला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता.

संबंधित बातम्या :

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

(Vijay Hazare Trophy 2021 player who remanin unsold in IPL auction Vishnu Solnanki made fabouls inning against goa)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.