Vijay Hazare Trophy 2021 चा थरार रंगणार, वेळापत्रक जाहीर

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी 6 फेब्रुवारीला विजय हजारे 2021 स्पर्धेचे (vijay hazare trophy 2021 schedule) वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Vijay Hazare Trophy 2021 चा थरार रंगणार, वेळापत्रक जाहीर
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 12:28 PM

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आगामी विजय हजारे करंडक 2021 (Vijay Hazare Trophy 2021 Schecule) साठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार 20 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत एकूण 23 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. तर 14 मार्चला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. एकूण 38 टीम विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. (vijay hazare trophy 2021 schedule announce)

या एकूण 38 टीमची विभागणी 5 एलीट आणि 1 प्लेट अशा एकूण 6 ग्रृपमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेचं आयोजन ग्रृपनिहाय एकूण 6 विविध शहरांमध्ये करण्यात आले आहे. जयपूर, सूरत, इंदूर, बंगळुरु, कोलकाता आणि तमिळनाडुमध्ये या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारीपर्यंत पोहचणार आहेत.

खेळाडूंची तीनदा कोरोना चाचणी होणार

कोरोना संसर्गानंतर बीसीसीआय खेळाडूंना कोणतीही बाधा होऊ नये, याची काळजी घेते आहे. बीसीसीआयच्या गाईडलाईननुसार हे सर्व संघ या स्पर्धेतील सामन्याच्या ठिकाणी पोहचल्यानंतर एकूण 3 वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या 3 कोरोना चाचणी 1 दिवसाआड करण्यात येणार आहेत. 13, 15 आणि 17 फेब्रुवारीला ही चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

20 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत साखळी फेरीतील सामने

विजय हजारे स्पर्धेतील साखळी सामने 20 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत खेळण्यात येणार आहेत. यानंतर 7 मार्चपासून बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहेत. मात्र अजूनही या बाद फेरीतील सामन्यांच्या ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नाही.

बाद फेरीचं वेळापत्रक

या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार एलिमिनेटर सामना 7 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर क्वार्टर फायनल सामन्यांचं आयोजन 8 आणि 9 मार्चला केलं गेलं आहे. सेमी फायनल मॅच 11 मार्चला पार पडणार आहे. तर 14 मार्चला विजेतेपदासाठी थरार रंगणार आहे.

स्पर्धेसाठी ग्रुपनिहाय संघ

एलीट ए ग्रुप- टीम- गुजरात, छत्तीसगढ़, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदे आणि गोवा ठिकाण – सूरत

एलीट बी ग्रुप- टीम- तमिळनाडु, पंजाब, झारखंड, मध्यप्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश ठिकाण – इंदौर

एलीट सी ग्रुप- टीम- कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरल, उड़ीसा, रेलवे, बिहार ठिकाण – बंगळुरु

एलीट डी ग्रुप- टीम- दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी ठिकाण – जयपुर

एलीट ई ग्रुप- टीम- बंगाल, सर्विसेज, जम्मू-कश्मीर, सौराष्ट्र, हरियाणा, चंडीगड ठिकाण – कोलकाता

प्लेट ग्रुप टीम- उत्तराखंड, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपुर, अरूणाचल प्रदेश, मिजोरम आणि सिक्किम ठिकाण – तमिळनाडु

एलिट आणि प्लेट म्हणजे काय?

एलिट म्हणजे अव्वल संघांचा गट होय. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे, अनेकदा विजेतपद पटकावलेले, याधीच्या पर्वात टॉप4, टॉप8 मध्ये असणारे संघ असतात. स्पर्धेच्या शेवटी एलिट गटात असमाधानकारक कामगिरी असलेल्यांची रवानगी प्लेट गटात केली जाते.

प्लेट ग्रुपमध्ये नवे तसेच फार उल्लेखनीय कामगिरी न करु शकणारे संघ असतात. ज्या टीम्स चांगली कामगिरी करतात त्यांची बढती एलिट गटात होते.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy साठी मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरसह एकूण 103 खेळाडूंची निवड

(vijay hazare trophy 2021 schedule announce)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.