सहाव्या क्रमांकावर उतरुन 9 चेंडूत चोपल्या 50 धावा, पण ‘या’ फलंदाजाच्या तुफानी शतकाने जिंकलं चाहत्यांचं मन

जय बिस्टा (Jay Bista) आधी मुंबईचे नेतृत्व करायचा.वसीम जाफरची उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आली. तेव्हा जाफरने जयला व्यावसायिक खेळाडू म्हणून उत्तराखंडला घेऊन आला.

सहाव्या क्रमांकावर उतरुन 9 चेंडूत चोपल्या 50 धावा, पण 'या' फलंदाजाच्या तुफानी शतकाने जिंकलं चाहत्यांचं मन
जय बिस्टा (Jay Bista) आधी मुंबईचे नेतृत्व करायचा.वसीम जाफरची उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आली. तेव्हा जाफरने जयला व्यावसायिक खेळाडू म्हणून उत्तराखंडला घेऊन आला.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 12:04 PM

चेन्नई : उत्तराखंड क्रिकेट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिलं. उत्तराखंडच्या टीमचा कोच वसीम जाफरला (Wasim Jaffer) दुर्देवीरित्या आपल्या पदाचा त्याग करावा लागला. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. पण यानंतर उत्तराखंड टीमने विजय हजारे करंडकात विजयी सलामी दिली आहे. सलामी फलंदाज जय बिस्टाच्या (Jay Bista) तुफानी शतकाच्या जोरावर टीमने प्लेट ग्रृपमधील मेघालयवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मेघालयने पहिले बॅटिंग करताना संजय यादवच्या (Sanjay Yadav)धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर 6 विकेट्स गमावून 242 धावा केल्या. उत्तराखंडने 243 धावांचं विजयी आव्हान 44.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. सलामीवीर जय बिस्टाने 119 चेंडूत 18 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 141 धावांची शतकी खेळी केली. या विजयामुळे उत्तराखंडला एकूण 4 पॉइंट्स मिळाले. (vijay hazare trophy 2021 uttarakhand jay bista scored century against Meghalaya)

जय बिस्टा पहिले मुंबईचे प्रतिनिधित्व करायचा. काही महिन्यांपूर्वी वसीम जाफरची उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तेव्हा जाफर जयला एक खेळाडू म्हणून सोबत घेऊन आला. मेघालय विरुद्धच्या सामन्यात या खेळाडूने शानदार कामगिरी केली. त्याने मेघालयच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. बिस्टाने चौकार-षटकारांच्या मदतीने अवघ्या  21  चेंडूत 90 धावांचा रतीब घातला. कॅप्टन कुनाल चंदेलानेही त्याला चांगली साथ दिली. चंदेलाने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. यासह उत्तराखंडने मेघालयवर सहज विजय मिळवला.

सहाव्या क्रमांकावर संजयची जोरदार फटकेबाजी

याआधी उत्तराखंडने नाणेफेक जिंकून मेघालयला फलंदाजीसाठी भाग पाडले. मेघालयला सन्मानजनक धावसंख्या करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मेघालयच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना आश्वासक सुरुवात तर मिळाली. पण त्यांच्या बॅट्समनना मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन पुनीत बिष्टचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. बिष्ट 48 धावांवर बाद झाला. तर रवी तेजाही 44 धावांवर बाद झाला. यामुळे मेघालय अडचणीत सापडली होती. पण यानंतर संजय यादवने सहाव्या क्रमांकावर येत स्कोअरबोर्डला धावतं ठेवलं. संजयने 49 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 81 धावांचा किस पाडला. संजय शेवटच्या षटकात बाद झाला.

मुंबईकडून संधी न मिळाल्याने उत्तराखंडकडून खेळायला सुरुवात

दरम्यान 25 वर्षीय जय बिस्टाला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे जयने या मोसमात मुंबईला रामराम ठोकत उत्तराखंडकडून खेळण्यासाठी निघून गेला. जयने 26 प्रथम श्रेणी सामन्यात 33 च्या सरासरीने 1 हजार 468 धावा केल्या. तर 15 लिस्ट ए सामन्यात 590 तर 28 टी 20 मॅचमध्ये 902 धावा चोपल्या आहेत.

बिस्टा काय म्हणाला होता?

“मी गेल्या मोसमात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईकडून 6 सामन्यात खेळताना सर्वाधिक 256 धावा केल्या होत्या. पण यानंतरही पृथ्वी शॉला खेळवण्यासाठी मला संघाबाहेर बसवण्यात आले”. जय मुळचा नेपालचा आहे. पण जयचं कुटुंब त्याच्या जन्माआधीपासूनच मुंबईत वास्तव्यास आहेत.

संबंधित बातम्या :

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनासाठी धावून आला सचिनचा कट्टर मित्र, म्हणाला…..

(vijay hazare trophy 2021 uttarakhand jay bista scored century against Meghalaya)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.