VHT 2024-25 : उपांत्य फेरीत कर्नाटक हरियाणा आमनेसामने, अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी ‘करो या मरो’

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्नाटक आणि हरियाणा हे दोन संघ भिडणार आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत एक एक सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ मजबूत स्थितीत असून उपांत्य फेरीत तूल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे. बुधवारी हा सामना वडोदऱ्याच्या कोटंबी मैदानात रंगणार आहे.

VHT 2024-25 : उपांत्य फेरीत कर्नाटक हरियाणा आमनेसामने, अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी 'करो या मरो'
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 6:50 PM

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. तीन सामन्यानंतर या स्पर्धेचा विजेता कळणार आहे. कर्नाटक, हरियाणा, विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात जेतेपदासाठी चुरस असणार आहे. उपांत्य फेरीत कर्नाटक विरुद्ध हरियाणा आणि महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असा सामना होणार आहे. हरियाणा विरुद्ध कर्नाटक हा सामना 15 जानेवारीला वडोदऱ्याच्या कोटंबी स्टेडियामध्ये होणार आहे. दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरु होईल. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकला आतापर्यंत फक्त एकाच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. साखळी फेरीत हैदराबादने 3 विकेट आणि दोन चेंडू राखून पराभूत केलं होतं. या व्यतिरिक्त कोणत्याही संघाला कर्नाटकला पराभूत करता आलं नाही. कर्नाटकने साखळी फेरीत मुंबईचा 7 गडी आणि 22 चेंडू राखून, पुडुचेरीचा 3 विकेट आणि 55 चेंडू राखून, पंजाबचा 1 विकेट आणि 15 चेंडू राखून, अरुणाचल प्रदेशाचा 10 विकेट राखून, सौराष्ट्राचा 60 धावांनी, नागालँडचा 9 विकेट आणि 73 चेंडू राखून पराभव केला. बाद फेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बदोड्याला 5 धावांनी पराबूत केलं.

दुसरीकडे, हरियाणाची या स्पर्धेत सुरुवात पराभवाने झाली होती. पहिल्याच सामन्यात गुजरातने 7 विकेट आणि 82 राखून पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर हरियाणाने कमबॅक केलं. गोव्याला 8 विकेट आणि 32 चेंडू राखून, झारखंडला 64 धावांनी, आसामला 8 विकेट आणि 90 चेंडू राखून, उत्तराखंडला 2 विकेट आणि 6 चेंडू राखून, ओडिशाला 4 विकेट आणि 18 चेंडू राखून, मणिपूरला 6 विकेट आणि 94 चेंडू राखून, बंगालला 72 धावांनी पराभूत केलं होतं. तर उपांत्यपूर्व फेरीत गुजरातला पराभूत करत वचपा काढला. हा सामना हरियाणाने 2 विकेट आणि 34 चेंडू राखून जिंकला. आता उपांत्य फेरीत कर्नाटकशी सामना होणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

हरियाणा संघ: अर्श रंगा, हिमांशू राणा, अंकित कुमार (कर्णधार), पार्थ वत्स, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), राहुल तेवतिया, सुमित कुमार, अनुज ठकराल, अंशुल कंबोज, अमित राणा, मयंक शांडिल्य, हर्षल पटेल, जयंत यादव , अशोक मेनारिया, युवराज योगेंद्र सिंग, कपिल हुडा, अमन कुमार, वेदांत भारद्वाज, धीरू सिंग, आदित्य दीपक कुमार.

कर्नाटक संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनीश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक राज, श्रेयस गोपाल, प्रसीद कृष्णा, अभिलाष शेट्टी, वासुकी कौशिक, मनोज भंडागे, लुवनीथ सिंकूश, व्ही. , प्रवीण दुबे, निकीन जोसे, विद्याधर पाटील, किशन बेदरे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...