Vinod Kambli ने लढवलेली निवडणूक, काय होता निकाल? किती मतं मिळाली?

Vinod Kambli Contested Assembly Election : क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या विनोद कांबळी याने आमदार होण्यासाठी निवडणूक लढवली होती. जाणून घ्या कांबळीचा त्या निवडणुकीतील स्कोअर काय होता?

Vinod Kambli ने लढवलेली निवडणूक, काय होता निकाल? किती मतं मिळाली?
Vinod Kambli Contested Assembly Election
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 5:48 PM

सचिन तेंडुलकरचा जिगरी यार आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वत्र कांबळी आणि कांबळीचीच चर्चा पाहायला मिळतेय. महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात विनोद कांबळीची असलेली शारिरीक स्थिती सर्वांनी पाहिली. आपल्या लाडक्या आणि आवडत्या माजी क्रिकेटपटूची अवस्था क्रिकेट चाहत्यांना पाहवली नाही. तिथून कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला.

कांबळीने 90 च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला. कांबळीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर राजकीय खेळपट्टीवरही नशीब आजमावलं होतं. कांबळीने विधानसभा निवडणूक लढवली होती? कांबळीने कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती? निकाल काय लागला होता? कांबळीला किती मतं मिळाली होती? हे सर्व जाणून घेऊयात.

कांबळीने लोक भारती या पक्षाकडून 2009 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. कांबळी मुंबईतील पूर्व उपनगरातील विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होता. कांबळीसह या मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार आमदार होण्याच्या शर्यतीत होते. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. मोठ्या धामधुमीत प्रचार पार पडला. त्यानंतर 13 ऑक्टोबरला मतदान पार पडलं. तर 22 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला.

हे सुद्धा वाचा

निकाल काय?

मैदानात चौकार-षटकार ठोकणाऱ्या विनोद कांबळीला राजकारणातील पदार्पणात अपयश आलं. कांबळीचा या निवडणुकीत पराभव झाला. मात्र कांबळीने चौथ्या क्रमांकाची मतं मिळवली. मनसेचे मंगेश सांगळे 20 हजार 412 मताधिक्याने विजयी झाले. सांगळेंना 53 हजार 125 इतकी मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पल्लवी पाटील यांना 32 हजार 713 मतं मिळाली.शिवेसेनेचे दत्ताराम दळवी यांना 28 हजार 129 मतदारांनी आपला कौल दिला. तर कांबळीला 3 हजार 861 मतं मिळाली होती. कांबळीला एकूण मतदानाच्या 3.12 टक्के मतं मिळाली होती.

विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द

विनोद कांबळीने टीम इंडियाचं 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कांबळीने कसोटीत 21 डावांत 54.2 च्या सरासरीने 1 हजार 84 धावा केल्या. कांबळीने या दरम्यान 4 शतकं, 2 द्विशतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. तर कांबळीने 104 वनडेत 2 हजार 477 धावा केल्या. कांबळीने वनडेमध्ये 2 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.