विराटकडून निराशा, केएल राहुलची दमदार फलंदाजी, जाणून घ्या 10 खास गोष्टी

केएल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 55 धावा केल्या. राहुलने या डावात 35 चेंडूंचा सामना केला. यावेळी विराट आणि रोहित शर्मा दुसरीकडे कमी धावांनी आऊट झालाय. टीम इंडियाच्या दहा गोष्टी जाणून घ्या..

विराटकडून निराशा, केएल राहुलची दमदार फलंदाजी, जाणून घ्या 10 खास गोष्टी
केएल राहुलची दमदार फलंदाजीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 9:22 PM

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (India vs Australia 1st t20) पहिला सामना मोहालीत सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारतानं पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं लक्ष्य दिलंय. यावेळी टीम इंडियानं 20 षटकात सहा बाद 208 धावा काढल्या. यावेळी टीम इंडियावर टीका होताना दिसत आहे. काही फलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागलंय. यात उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) अव्वल स्थानावर आहे. त्यानं धडाकेबाज कामगिरी  केली असून रोहित शर्मानं (Rohit Sharma) देखील विक्रम केलाय.

मोहालीतील टीम इंडियाची कामगिरी जाणून घ्या पाच पॉईंट्समध्ये

  1. केएल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 55 धावा केल्या. राहुलने या डावात 35 चेंडूंचा सामना केला.
  2. यादरम्यान राहुलनं 4 चौकार आणि 3 उत्कृष्ट षटकार लगावले.
  3. राहुलने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
  4. राहुलचे हे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक होते.
  5. 2022 मध्ये राहुलचे हे दुसरे अर्धशतक आहे.
  6. राहुलने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलंय आहे.
  7. यापूर्वी राहुलनं आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 62 धावा केल्या होत्या.
  8. एवढेच नाही तर राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मधील सर्वात मोठी धावसंख्या केली. या संघाविरुद्ध भारतीय फलंदाजाचे हे तिसरे अर्धशतक आहे.
  9. या खेळीदरम्यान राहुलने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर फक्त तिसरा भारतीय फलंदाज आहे.
  10. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये बाबर आझम (52 डाव) आणि विराट कोहली (56 डाव) नंतर 2000 धावा पूर्ण करणारा राहुल (58 डाव) हा तिसरा फलंदाज आहे.

विराटकडून निराशा

विराट पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत नाथन एलिकच्या चेंडूवर विराट आऊट झालाय. यावेळी कोहलीची विकेट कॅमरुन ग्रीननं घेतली. विराट कोहलीनं घोर निराशा केल्याचं चाहते म्हणताना दिसतायत.

रोहित शर्माचा रेकॉर्ड

रोहितनं मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.