Virat Kohali : विराट कोहलीची कसून तयारी, हँगकाँगविरुद्ध जिंकण्यासाठी करतोय मेहनत
कोहलीला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो कागदावर कमकुवत हाँगकाँग संघाविरुद्ध शतकांचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीचे हे खास फोटो प्रचंड व्हायरल देखील होतायतय. वाचा...
नवी दिल्ली : विराट कोहली याने (Virat Kohali) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात संथ पण शानदार खेळी केली. त्यानं 35 धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात त्याने काही शानदार फटकेही मारले. लोकांना वाटत होते की कोहली हा सामना स्वबळावर जिंकेल. मात्र, तसे झाले नाही आणि कोहलीने खराब शॉटवर आपली विकेट गमावली. आता बुधवारी भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे. या सामन्यात विराट आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मंगळवारी त्याने जिममध्ये घाम गाळतानाचे फोटो शेअर केले. कोहलीला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो कागदावर कमकुवत हाँगकाँग संघाविरुद्ध शतकांचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीचे हे खास फोटो प्रचंड व्हायरल देखील होतायतय.
हे ट्विट पाहा
?️♂️? pic.twitter.com/g7u7GvDIae
— Virat Kohli (@imVkohli) August 30, 2022
हे सुद्धा वाचा
शतकाची प्रतीक्षा
- नोव्हेंबर 2019 पासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही
- विराटचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध होते
- विराटनं 136 धावांची खेळी खेळली
- कोहलीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा 69 सामन्यांच्या 80 डावांमध्ये 35.46 च्या सरासरीने 2589 धावा केल्या आहेत.
- कोहलीनं 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
- 1 डिसेंबर 2019 पासून तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे.
- कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 94 धावा आहे, जी त्याने फक्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केली आहे.
- विराटचे T20 मध्ये एकही शतक नाही. अशा परिस्थितीत तो हाँगकाँगविरुद्धही हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
ब्रेकनंतर आशा
जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोहली आशिया चषकाद्वारे मैदानात परतला. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर कोहली ब्रेकवर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकून झेलबाद झाला.
हा व्हिडीओ पाहिलाय का?
The match may be over but moments like these shine bright ✨?
A heartwarming gesture by @imVkohli as he hands over a signed jersey to Pakistan’s Haris Rauf post the #INDvPAK game ??#TeamIndia | #AsiaCup2022 pic.twitter.com/3qqejMKHjG
— BCCI (@BCCI) August 29, 2022
सामन्यानंतर कोहलीने औदार्य दाखवत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफची इच्छा पूर्ण केली. हरिसने कोहलीला त्याची जर्सी मागितली आणि त्याला ऑटोग्राफ देण्यास सांगितले. विराटने त्याची इच्छा पूर्ण करताना हे केले. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. क्रिकेट चाहत्यांना ते खूप आवडते.