Virat Kohli | विराट कोहली याचं 49 वं ऐतिहासिक शतक, सर्वाधिक शंभर कोणत्या टीम विरुद्ध?
Virat Kohli 49 th Odi Century | विराट कोहली याने 49 वं एकदिवसीय शतक ठोकत कारनामा केलाय. विराटने कोणत्या टीम विरुद्ध किती शतकं केली आहेत, कोणत्या टीम विरुद्ध सर्वाधिक शतकं आहेत, हे जाणून घेऊयात.
कोलकाता | विराट कोहली याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 37 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक करत इतिहास रचला आहे. विराट कोहली याने 10 फोरसह हे शतक केलं. विराटच्या वनडे कारकीर्दीतील हे 49 वं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील म्हणजेच एकूण 87 वं शतक ठरलं. विराटने हे शतक करताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने सचिनच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली. विराटने 277 डावांमध्ये ही 49 वं वनडे शतक ठोकलं. तर सचिनने ही कामगिरी 277 डावात केली होती. किंग कोहलीच्या या विक्रमाच्या निमित्ताने त्याने कोणत्या टीम विरुद्ध किती रेकॉर्ड्स केले आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
कोणत्या टीम विरुद्ध किती शतकं?
विराटने श्रीलंका विरुद्ध सर्वाधिक 10 एकदिवसीय शतकं केली आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध 9 सेंच्युरी लगावल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वेळा शतक ठोकल्यानंतर बॅट उंचावली आहे. नागीन डान्स स्पेशालिस्ट बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध किंग कोहलीने प्रत्येकी 5-5 शतकं केली आहेत. तसेच विराटचं हे दक्षिण आफ्रिका विरुद्धचं पाचवं शतक ठरलं. विराटने इंग्लंड आणि कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध प्रत्येकी 3 शतक केली आहेत. तर विराटने झिंबाब्वे विरुद्ध सर्वात कमी आणि एकमेव शतक ठोकलंय.
विराट तिसरा भारतीय
दरम्यान विराट कोहली आपल्या वाढदिवशी शतक करणारा पहिला सक्रीय आणि एकूण तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या 2 भारतीयांनी ही कामगिरी केली. कांबलीने 1993 मध्ये इंग्लंड विरूद्ध नाबाद 100 धावा केल्या. तर सचिनने 1998 ला ऑस्ट्रेलिया विरूद्ध 134 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता विराटने ही कामगिरी केली आहे.
विराट कोहली याचं 49 वं वनडे शतक
Virat Kohli touches greatness with a 49th ODI hundred in Kolkata 🔥#CWC23https://t.co/2XrbhrFlbK
— ICC (@ICC) November 5, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.