Virat Anushka | विराट-अनुष्का यांना पुत्ररत्न, ‘अकाय’ नावाचा अर्थ काय?

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट खेळत नाही. कौटुंबिक कारण देत विराट कोहली क्रिकेटपासून दूर आहे. पण नेमकं काय कारण आहे कोणालाच माहिती नव्हतं. अखेर खरं कारण समोर आलं आहे. अनुष्का शर्माने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Virat Anushka | विराट-अनुष्का यांना पुत्ररत्न,  'अकाय' नावाचा अर्थ काय?
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 9:54 PM

मुंबई : विराट कोहलीच्या घरी एक गोंडस बाळ आलं आहे. अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. वामिका भाऊ मिळाला असून फॅमिली कम्प्लिट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली क्रिकेटपासून दूर या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. 15 फेब्रुवारीला अनुष्का आणि विराटच्या घरी बाळ जन्माला आलं आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नावंही जाहीर केलं आहे. विराटने आपल्या मुलांच नाव अकाय ठेवलं आहे. खरं तर विराट कोहलीने बाळाच्या जन्माच्या पाच दिवसानंतर ही बातमी उघड केली आहे. कारण बाळाचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आहे. बीसीसीआयनेही त्याच्या प्रायव्हसीचा आदर करा असं सांगितलं होतं. विराट कोहलीचं नाव पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी जाहीर केलं नव्हतं. त्यानंतर उर्वरित तीन कसोटी सामन्यापासून त्याने दूर राहिला. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते नेमकं काय झालं आहे याबाबत संभ्रमात होते.

आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी 15 फेब्रुवारीला एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिका छोटा भाऊ मिळाला आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठिशी कायम राहू दे. माझी तुम्हाला विनंती आहे की प्रायव्हसीचा मान राखावा., असं ट्वीट विराट कोहली याने केलं आहे.

अकाय नावाचा अर्थ काय?

विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. या नावाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अकाय या नावाचा अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो. वामिकाच्या नावाची अशीच चर्चा रंगली होती. वामिकाच्या नावाचाही एक अर्थ आहे. वामिका म्हणजे दुर्गा देवी. दुर्गा देवीच्या दुसऱ्या रुपाला वामिका म्हंटलं जातं. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलांची नावं अर्थपूर्ण ठेवली आहेत.

विराट कोहलीने गोडी बातमी देताच कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. चाहत्यांनी काही मिनिटांतच कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील दिग्गजांनीही विराट कोहली आणि अनुष्काचं अभिनंदन केलं आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.